Peoples Media Pune header

Go Back

दोहा(कतार)व पुण्यातील शिष्ट्रमंडळांची पुणे येथे संयुक्त बैठक

27 Mar 2019

 दोहा(कतार)व पुण्यातील उद्योजकांची संयुक्त बैठक पुणे येथील हॉटेल विवांता-ताज येथे आयोजित करण्यात आली प्राईमव्हॅल्युच्या वतीने याचे आयोजन करण्यात आले.इंटरनॅशनल बिझनेस डेलिगेशन व इन्व्हेस्टर समिटच्या माध्यमातून .कतार व पुणे यांतील परस्पर उद्योग,व्यापार,आयात निर्यात वाढावी तसेच पुणे व भारतातील उद्योगांना तेथील संधीचा लाभ व्हावा या हेतूने याचे आयोजन करण्यात आले.या प्रसंगी कतारचे लिओनार्डो  टबीलोग,विनीत नंबियार,समशीर हमजा,पुणे येथील विणापाणी जोशी व त्यांचे सहकारी उपस्थित होते. याप्रसंगी बोलताना लिओनार्डो टबीलोग म्हणाले कतार येथे पुणे भारतीय उद्योगांना मोठ्या व्यवसाय संधी उपलब्ध आहेत.व यासाठी तेथे मुबलक निधि उपलब्ध आहे असे संगितले. विनीत नंबियार यांनी बोलताना पुणेकर व भारतीयांचे कतार(दोहा)मध्ये आपुलकीने स्वागत होते.तसेच तेथे भारतीय समुदाय मोठ्या संखेने आहे.नवनवीन कल्पक उद्योगांची तेथे गरज आहे याचा लाभ येथील उद्योजकांनी घ्यावा असे संगितले.   

छायाचित्र :दोहा(कतार)व भारतीय उद्योजकांचे समूह चित्र 

 

Peoples Media Pune.

© 2011. Peoples Media Pune

http://www.peoplesmediapune.com | Powered By Easily Editable Business Website - Joysite