Peoples Media Pune header

Go Back

बीएनआय उडान चाप्टरच्या अध्यक्षपदी कुशल शहा

31 Mar 2019

उद्योजकांमध्ये सहकार्य वाढविणारी संस्था बीएनआयच्या उडान चाप्टरच्या अध्यक्षपदी कुशल शहा यांची निवड करण्यात आली.मावळते अध्यक्ष डॉ.समीर डोलारे यांच्याकडून त्यांनी सूत्रे स्वीकारली.तसेच उपाध्यक्षपदी प्रकाश सुथार,सचिव श्रेयश रुकारी यांची निवड करण्यात आली.हॉटेल कपिला येथे झालेल्या या समारंभ प्रसंगी उद्योजक सदस्य उपस्थित होते.बीएनआय ईस्ट झोनचे एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर भरत डागा व अतुल जोगळेकर यांनी त्यांचे अभिनंदन केले.व उद्योजकांनी स्पर्धे एवजी एकमेकांना मदत करून उद्योग-व्यवसाय वाढवावा असा संदेश दिला.नवनियुक्त अध्यक्ष कुशल शहा यांनी आगामी काळात सदस्यांच्या उद्योग व्यवसायात पूरक असे सहाय्य करणार असल्याचे संगितले.  

छायाचित्र :कुशल शहा 

 

Peoples Media Pune.

© 2011. Peoples Media Pune

http://www.peoplesmediapune.com | Powered By Easily Editable Business Website - Joysite