Peoples Media Pune header

Go Back

रोटरी क्लब ऑफ हडपसर सेंट्रल व डाउन टाउनच्या वतीने कृत्रिम हात बसविले

10 Apr 2019

हात हा अत्यंत महत्वाचा आवयव काही कारणाने तो नसेल तर अत्यंत अडचणीचे होते.हा लक्षात घेवून रोटरी क्लब ऑफ हडपसर सेंट्रलपुणे डाउन टाउन यांच्या संयुक्त विद्यमाने त्यांना कृत्रिम हात बसविण्याचा उपक्रम राबविण्यात आला.याचे तांत्रिक संचालन सानेगुरूजी हॉस्पिटल हडपसर येथे करण्यात आले. अहमद नगर येथील सुदिक दादा कोपर्डे व अभिजीत पवार,दौंड येथील रामदास ढवळे या रुग्णांना NL-4  रोपण करण्यात आले.ते आता सर्वसाधारण कामे विनासायास करू शकतील.या प्रसंगी रोटरी क्लब डाउन टाउनचे रो.जितू मेहता,रोटरी क्लब ऑफ हडपसरचे सेंट्रलचे अध्यक्ष वामन भुरे,सेक्रेटरी महेंद्र लुणीया,सचिन तुपे,राकेश रांका,दिपाली माळी,शारदा लुणीया,शिंगाडे एसआर,व संपत खोमणे आदि मान्यवर उपस्थित होते.

छायाचित्र :कृत्रिम हस्त रोपित रुग्ण व मान्यवर यांचे समूहचित्र 

 

Peoples Media Pune.

© 2011. Peoples Media Pune

http://www.peoplesmediapune.com | Powered By Easily Editable Business Website - Joysite