Peoples Media Pune header

Go Back

विद्यार्थ्यानी सादर केले विविध नृत्य प्रकार

29 Apr 2019

भारतीय नृत्यप्रकारातील कथ्थक नृत्यशैलीतील विविध नृत्य सादर करून अक्षता डान्स अकॅडमीच्या विद्यार्थ्यांनी विविध नृत्य सादर करून पालकांची मने जिंकली.भारतीय विद्याभवन शाळेच्या नातू सभागृहात झालेल्या या कार्यक्रम प्रसंगी नृत्यअलंकार अक्षता माने,रिटा.कर्नल सदानंद साळुंखे(विरचक्र),विजय भोसले(अध्यक्ष नवचैतन्य हास्य क्लब),प्रिती गंगाखेडकर,श्रीकांत माने,कविता माने आदि मान्यवरांच्या बरोबरच पालक उपस्थित होते.यावेळी विद्यार्थ्यानी बालगीत नाचरे मोरा,मोहे पनघट नंदलाल,नृत्यअलंकार अक्षता माने यांनी ताल त्रिताल(16 मात्रा),द्रुतलय,जुगलबंदी आदींबरोबरच पाकीजा,उमरावजान चित्रपटांतील नृत्य सादर केली.यात दिल चीज कया है आप मेरी जान लिजिये,ईन्ही लोगोने ले लिना दुपट्टा मेरा या गाण्यांचा समावेश होता.या वेळी बोलताना रिटा.कर्नल सदानंद साळुंखे(विरचक्र) यांनी शालेय शिक्षण आवश्यक आहेच मात्र कलेची ही जोपासना विद्यार्थ्यानी करावी असे संगितले.

छायाचित्र :पाकीजा चित्रपटातील “ईन्ही लोगोने ले लीना दुपट्टा मेरा”गाणे सादर करताना नृत्यअलंकार अक्षता माने 

 

Peoples Media Pune.

© 2011. Peoples Media Pune

http://www.peoplesmediapune.com | Powered By Easily Editable Business Website - Joysite