Peoples Media Pune header

Go Back

मालक व मजूर-कर्मचारी यांनी केले पाणी फाउंडेशनच्या कार्यात श्रमदान

02 May 2019

पाणी फाउंडेशनच्यावतीने १ मे या महाराष्ट्र दिनी महाश्रमदान शिबिराचे आयोजन केले.पुरंदर तालुक्यातील गराडे गावात हे संपन्न झाले. श्रीराम बिल्डर्सच्या मालक,मजूर,कर्मचारी व कार्यालयीन कर्मचारी यांनी यात श्रमदान केले. अजित कुलकर्णी(प्रोप्रायटर),नितिन कुलकर्णी,ऋत्विक कुलकर्णी,ऐश्वर्या कुलकर्णी आदीं बरोबरच इंजिनियर्स,मजूर,कार्यालयीन कर्मचारी असे मिळून २६ जणांनी यात सहभाग घेतला. अजित कुलकर्णी यांनी आर्थिक सहभाग असंख्य लोक घेतात मात्र या विषयी आयोजकांच्या मते सर्वांनी प्रत्यक्ष श्रमदानात सहभाग घेणे महत्वाचे  असे मत व्यक्त केल्याने यात प्रथमच सहभाग घेतला.पाणीप्रश्ना वरील या उत्तम कार्यात दरवर्षी सहभागी होवू असे संगितले.   

छायाचित्र :श्रमदान करताना 

 

Peoples Media Pune.

© 2011. Peoples Media Pune

http://www.peoplesmediapune.com | Powered By Easily Editable Business Website - Joysite