Peoples Media Pune header

Go Back

होमकॉम टेक्नॉलॉजीस या होमऑटोमेशन असणार्‍या शोरूमचे उद्घाटन.

15 May 2019

होमकॉम टेक्नॉलॉजीस या होमऑटोमेशन असणार्‍या शोरूमचे उद्घाटन नुकतेच ए अँड आय डायजेस्ट (A & I Digest)मासिकाचे संपादक अमित दनैत यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी ओसम(OSUM)कंपनीचे कार्यकारी संचालक सचिन मोटवाणी,होमकॉम टेक्नॉलॉजीस चे संचालक शरद निकम व कपिल काळभोर आदि मान्यवर उपस्थित होते. या शोरूम मध्ये आपल्या घरातील सर्व इलेक्ट्रोनिक वस्तु,एसी,लाइट,फॅन,होम थिएटर,व इतर सर्व वस्तूंचे नियंत्रण प्रेसटच स्वीचेस,मोबाइल व अलेक्सा तर्फे व्हाईस मोडने करता येते.तसेच या सर्वांचे प्रात्यक्षिक ग्राहकाला अनुभवता येईल अशी व्यवस्था शोरूम मध्ये उपलब्ध आहे. हल्लीच्या काळात स्मार्टफोन हा दैनंदिन जीवनाचा अविभाज्य घटक झाला आहे.स्मार्टफोन सारखेच स्मार्ट होम संकल्पना आपल्या आयुष्याचा घटक होण्याचा काळ आला आहे असे पत्रकात नमूद करण्यात आले आहे.

छायाचित्र :उद्घाटन प्रसंगी अमित दनैत,सचिन मोटवाणी,शरद निकम व कपिल काळभोर

 

Peoples Media Pune.

© 2011. Peoples Media Pune

http://www.peoplesmediapune.com | Powered By Easily Editable Business Website - Joysite