Peoples Media Pune header

Go Back

“ए दिल मुझे बता दे”,कार्यक्रमाचे २४ मे रोजी आयोजन.

16 May 2019

निवडणुकीचा निकाल लागल्यामुळे तमाम भारतीयांना याचे उत्तर मिळाले असेल.आपल्या आवडत्या नेत्याचा विजय साजरा करण्यासाठी शुक्रवार दिनांक २४ मे रोजी  बहारदार गीतांचा रंगारंग कार्यकम “ए दिल मुझे बता दे”या कार्यक्रमाचे आयोजन के सेरा सेरा मल्टी इव्हेंट आयोजित,श्री स्वामी समर्थ डायग्नोस्टिक सेंटर प्रायोजित,मुरुडकर झेंडेवाले व फेटेवाले,भारत फ्लॅग फाउंडेशन यांच्या सहकार्याने केले आहे.स्वर्गीय गीता दत्त यांच्या सुमधुर गाण्यांची मेजवानी !के सेरा सेरा मल्टीइव्हेंटच्या संचालिका क्रांती शहा,व विलास रवांदे यांच्या संकल्पनेतून या कार्यक्रमाची निर्मिती साकारली आहे.

    सुप्रसिद्ध गीतांजली जेधे व हिम्मतकुमार पंड्या यांच्या स्वरात सुसज्ज वाद्यवृंदासह ही मैफिल रंगणार आहे.एमईएस सभागृह,मयूर कॉलनी,कोथरूड येथे. “गाणं ऐकण आणि गाणं  अनुभवण”यातला फरक अनुभवण्यासाठी चुकवू नये असा दर्जेदार कार्यक्रम !!अनेक मान्यवरांची उपस्थिती या कार्यक्रमाची रंगत वाढवेल.मधुरंग संस्थेतर्फे गायिका गीतांजली जेधे यांना मन्ना डे जन्मशताब्दीचे औचित्य साधून मन्ना डे स्मृति आंतराष्ट्रीय पुरस्कार विश्वविक्रमवीर डॉक्टर मधुसूदन घाणेकर यांच्या शुभहस्ते देण्यात येणार आहे. 

 

Peoples Media Pune.

© 2011. Peoples Media Pune

http://www.peoplesmediapune.com | Powered By Easily Editable Business Website - Joysite