Peoples Media Pune header

Go Back

डॉ.सुधीर राशिंगकर यांच्या “माझे जीवन गाणे”,आत्मचरित्राचे डॉ.अशोक कामत यांच्या हस्ते प्रकाशन

19 May 2019

लेखकडॉ.सुधीर राशिंगकर यांच्या आत्मचरित्राचे प्रकाशन संत साहित्याचे अभ्यासक डॉ.अशोक कामत यांच्या हस्ते झाले.निवारा वृद्धाश्रम सभागृहात झालेल्या या कार्यक्रम प्रसंगी रोटरीचे माजी प्रांतपाल प्रमोद जेजूरीकर,उत्कर्ष प्रकाशनचे सुधाकर जोशी,सविता जोशी,प्राचार्यशाम भुर्के,अरुण नुलकर आदि मान्यवरांच्या बरोबरच विविध क्षेत्रातील मान्यवर,रोटरी पदाधिकारी,सदस्य व नागरिक उपस्थित होते.या प्रसंगी बोलताना डॉ.अशोक कामत यांनी हल्लीच्या काळात निकोप दृस्टी असणे दुर्मिळ झाले आहे कारण सामाजिक व राजकीय वातावरण गढूळ झाले आहे.मात्र सत्य स्थितीचे आकलन होण्यासाठी निकोप जीवन दृस्टी हवी असे प्रतिपादन केले.लेखक सुधीर राशिंगकर यांनी मनोगत सांगताना जीवनात सुख,दु:ख,चढ उतार येत असतात मात्र रेल्वे प्रवासात ज्याप्रमाणे झाडे मागे जातात गाडी व प्रवासी पुढेच जातो त्याप्रमाणे आपण झाल्या घटना मागे टाकून पुढे जावे असे.संगितले.उत्कर्ष प्रकाशनाच्या या पुस्तकात पुणे व अन्य ठिकाणच्या सामाजिक,संस्कृतिक व नाते संबंधातील बदलांचा इतिहास उलगडतो.या प्रसंगी डॉ.सुधीर राशिंगकर यांच्या व्यावसायिक व सामाजिक जीवनाविषयी प्राचार्य शाम भुर्के यांनी मुलाखत घेतली.  २१२ पाने असलेल्या या पुस्तकाची किमत २२५ आहे.

छायाचित्र :डावीकडून सुधाकर जोशी,प्रमोद जेजूरीकर,अशोक कामत,सुधीर रशिंगकर,शाम भुर्के,अरुण नुलकर.  

 

Peoples Media Pune.

© 2011. Peoples Media Pune

http://www.peoplesmediapune.com | Powered By Easily Editable Business Website - Joysite