Peoples Media Pune header

Go Back

रमजान ईद निमित्ताने नगरसेविका सुजाताताई शेट्टी,सदानंद शेट्टी यांच्या वतीने स्वच्छता मोहीम

03 Jun 2019

रमजान ईद नजीक येवून ठेपल्याच्या पार्श्वभूमीवर नगरसेविका सुजाताताई शेट्टी,माजी स्थायी समिति अध्यक्ष सदानंद शेट्टी यांच्यावतीने प्रभाग १६ मधील जुना बाजार खड्डा गाडीतळ येथे स्वच्छता मोहिमेचे आयोजन करण्यात आले. यात पुणे महानगर पालिकेचे मंडई अधिकारी,क्षेत्रीय अधिकारी,अतिक्रमण प्रमुख,पोलिस अधिकारी आरोग्य अधिकारी यांच्या बरोबरच ६० कर्मचारी वर्गाने सहभाग घेतला.या प्रसंगी माजी नगरसेवक बुवा नलावडे,वरीष्ठ आरोग्य निरीक्षक सुनील मोहिते,आरोग्य निरीक्षक  कृष्णा अवघडे,कॉ.अण्णाभाऊ साठे श्रमिक कला पथकाचे चंद्र्कांत जाधव,सुभाष शिंदे,गफ्फारभाई शेख,अब्दूल घोलावले,युसुफ शेख,दौला पिरजादे,अमोल शेंडगे,शाबेरा शेख,आदि मान्यवरांच्या बरोबरच स्थानिक नागरिक,व्यावसायिक,व कार्यकर्ते उपस्थित होते.या प्रसंगी बोलताना सदानंद शेट्टी यांनी ईद जवळ येऊन ठेपली आहे.त्यामुळे पूर्व तयारी व सर्वांना आरोग्यपूर्ण वातावरण मिळावे यासाठी या उपक्रमाचे आयोजन केल्याचे संगितले.सुजाताताई शेट्टी यांनी यात नागरिकाच्या सहभागाचे कौतुक केले.व यात कायम सहकार्य करावे असे आवाहन केले.  

छायाचित्र :स्वच्छता मोहिमेत सहभागी सदानंद शेट्टी,सुजाताताई शेट्टी व अन्य

 

Peoples Media Pune.

© 2011. Peoples Media Pune

http://www.peoplesmediapune.com | Powered By Easily Editable Business Website - Joysite