Peoples Media Pune header

Go Back

रोटरी क्लब डेक्कनच्या अध्यक्षपदी रो.डॉ.अलका निरंतर.

17 Jun 2019

रोटरी क्लब ऑफ डेक्कनच्या अध्यक्षपदी रो.डॉ.अलका निरंतर यांची निवड करण्यात आली.सचिवपदी रो.डॉ.अमित ओन्द्रे,खजिनदारपदी डॉ.निळ्कंठ पाषाणकर,संचालकपदी अर्चना टोपले,व शरद दिसले यांची निवड करण्यात आली.दामले हॉल,लॉ कॉलेज रोड येथे झालेल्या या कार्यक्रम प्रसंगी भावी प्रांतपाल रवी धोत्रे,सहाय्यक प्रांतपाल मधुमिता बर्वे आदि मान्यवरांच्या बरोबरच रोटरी सदस्य व कुटुंबिय उपस्थित होते.या प्रसंगी बोलताना नियोजित प्रांतपाल  रवी धोत्रे यांनी रोटरीचे कार्य समाजातील सर्व स्तरांना उपयुक्त आहे असे प्रतिपादन केले.नवनिर्वाचित अध्यक्ष रो.डॉ.निरंतर यांनी आगामी वर्षात आरोग्य,शिक्षण,पर्यावरण आदि क्षेत्रात विविध प्रकल्प राबविणार आसल्याचे संगितले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वैशाली ईनामदार यांनी केले  

छायाचित्र :रो.डॉ.अलका निरंतर 

 

Peoples Media Pune.

© 2011. Peoples Media Pune

http://www.peoplesmediapune.com | Powered By Easily Editable Business Website - Joysite