Peoples Media Pune header

Go Back

जैन सोशल ग्रुपपुणे डेक्कनच्या वतीने १२२ विद्यार्थ्यांना साहित्य वाटप

26 Jun 2019

पुणे याथिल जैन सोशल ग्रुपच्या वतीने सासवड येथील कन्या प्रशालेत पुरंदर तालुक्यातील सात विद्यालयातील १२२ गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले. चांबळी व कोडीतमधील कृषि औद्योगिक विद्यालय,सासवड येथील कन्याशाळा व वाघिरे हायस्कूल,एखतपुर येथील शिवशंभो विद्यालय,भिवंडी येथील हुतात्मा उमाजी नाईक विद्यालय आणि खानवडी येथील महात्मा फुले विद्यालयातील विद्यार्थ्यांना जैन सोशल ग्रुपचे अध्यक्ष संजय शहा,उपाध्यक्ष मनोज शहा,माजी अध्यक्ष प्रमोद शहा,विकास शहा,विजय शहा,सचिव आनंद शहा,नितिन दोषी,महेंद्र शहा,स्व.एकनाथकाका जगताप प्रतिस्ठानचे अध्यक्ष संतोष जगताप,मुख्याध्यापिका उषा सुळगेकर,यांच्या हस्ते हे वाटप करण्यात आले. या प्रसंगी संजय शहा,संतोष जगताप,प्रदीप जगताप,यांनी मनोगत व्यक्त केले.संतोषनाना जगताप यांनी कार्यक्रमाचे नियोजन,इस्माईल सैयद यांनी संचालन केले   

छायाचित्र :सासवड येथील गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करताना मान्यवर 

 

Peoples Media Pune.

© 2011. Peoples Media Pune

http://www.peoplesmediapune.com | Powered By Easily Editable Business Website - Joysite