Peoples Media Pune header

Go Back

“लोकांनी फक्त संसारीक बाहय सुखामागे धावू नये तर आंतरिक म्हणजेच आध्यात्मिक सुखाचाही आनंद घ्यावा”-प.पू.सुधांशुजी महाराज

28 Jun 2019

संसारीक बाहय सुखे ही बाहेरील बाबी व वस्तूंवर अवलंबून असतात,लोक त्यांच्या मागे जीवनभर पळतात मात्र त्यांचे समाधान होत नाही.आध्यात्म आंतरिक आनंद मिळवून देतो व ते क्षणिक नसते यासाठी लोकांनी फक्त बाहय सुखांमागे जावू नये तर योग्य गुरूंच्या मार्गदर्शनाने आध्यात्मिक व चिरंतन टिकणारे सुखाचा आनंद घ्यावा”,असे प्रतिपादन प.पू.सुधांशुजी महाराज यांनी केले. गुरुपोर्णिमे निमित्त विश्वजागृती मिशन पुणे मंडल आयोजित सत्संग-प्रवचन प्रसंगी ते बोलत होते.गणेश कला क्रीडा रंगमंच येथे आयोजित या कार्यक्रम प्रसंगी विश्व जागृती मिशन पुणे मंडलचे अध्यक्ष घनश्याम झंवर,महासचिव विष्णुभगवान आगरवाल,उपप्रधान गणेश कामठे,संघटन सचिव रविंद्रनाथ द्विवेदी आदि मान्यवरांच्या बरोबरच नागरिक मोठ्या संखेने उपस्थित होते.

छायाचित्र :दीप प्रज्वलन करताना सुधांशुजी महाराज घनश्याम झंवर,विष्णुभगवान आगरवाल,गणेश कामठे,रविंद्रनाथ द्विवेदी

 

Peoples Media Pune.

© 2011. Peoples Media Pune

http://www.peoplesmediapune.com | Powered By Easily Editable Business Website - Joysite