Peoples Media Pune header

Go Back

रोटरी क्लब शिवाजीनगरच्या अध्यक्षपदी अंजली रावेतकर.

01 Jul 2019

रोटरी क्लब शिवाजीनगरच्या अध्यक्षपदी रो.अंजली रावेतकर यांची निवड करण्यात आली.मावळत्या अध्यक्ष रो.ऋजुता देसाई यांच्याकडून त्यांनी सूत्रे स्वीकारली.  सचिवपदी अश्विनी अंबिके यांची निवड करण्यात आली.हॉटेल प्रेसिडेंट कर्वेरोड येथे झालेल्या या कार्यक्रम प्रसंगी प्रांतपाल रो.रवी धोत्रे,सहाय्यक प्रांतपाल रो.गौरी शिकारपुर.मिलन नाग(उद्योजक के.के.नाग कंपनी),आदी मान्यवरांच्या बरोबरच रोटरी पदाधिकारी,सदस्य व कुटुंबिय उपस्थित होते या प्रसंगी बोलताना प्रांतपाल रवी धोत्रे यांनी महाराष्ट्रात ज्याप्रमाणे भक्तीची वारी असते.त्याप्रमाणे रोटरी सदस्य समाजसेवेची वारीच करीत असतात.समाजाच्या गरजा ओळखून त्या पूर्ण करण्याचा प्रयत्न करावा असे संगितले.नवनिर्वाचित अध्यक्ष अंजली रावेतकर यांनी आगामी वर्षात पर्यावरण,शिक्षण,रुग्णसेवा व अन्य प्रकल्प राबविणार असल्याचे संगितले.   

छायाचित्र :अंजली रावेतकर 

 

Peoples Media Pune.

© 2011. Peoples Media Pune

http://www.peoplesmediapune.com | Powered By Easily Editable Business Website - Joysite