Peoples Media Pune header

Go Back

रोटरी क्लब व्हायब्रंट ईस्टच्या अध्यक्षपदी मुकेशभाई सोनी यांची निवड

03 Jul 2019

) रोटरी क्लब व्हायब्रंट ईस्टच्या अध्यक्षपदी मुकेश सोनी यांची निवड.मावळते अध्यक्ष रो.डॉ.दीपक लढढा यांच्याकडून त्यांनी सूत्रे स्विकारली.सेक्रेटरीपदी सुचित लोया तर खजिनदारपदी सुमित तावरे यांची निवड करण्यात आली.मराठा चेंबर्सच्या हडपसर येथील संकुलात झालेल्या या कार्यक्रम प्रसंगी प्रांतपाल रवी धोत्रे,सहाय्यक प्रांतपाल भूषण महाजन,सुबोध मालपाणी(मेंटॉर),मीनाताई बोराटे आदी मान्यवरांच्या बरोबरच पदाधिकारी,रोटरी सदस्य व कुटुंबिय उपस्थित होते. या प्रसंगी बोलताना प्रांतपाल रवी धोत्रे यांनी सामाजिक कार्य करताना ध्येय मोठी असली तरी प्रयत्नांनी ती साध्य करता येतात असे संगितले.नवनिर्वाचित अध्यक्ष रो. मुकेशभाई सोनी यांनी आगामी काळात हॅप्पी स्कूल,जलशुद्धीकरण,रुग्णालयांना उपकरणे,व अन्य प्रकल्प राबविणार असल्याचे संगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विशाल भराडीया यांनी केले.   

 

छायाचित्र :मुकेश सोनी 

 

Peoples Media Pune.

© 2011. Peoples Media Pune

http://www.peoplesmediapune.com | Powered By Easily Editable Business Website - Joysite