Peoples Media Pune header

Go Back

शांतिनिकेतन सेवा प्रतिष्ठान व स्वामी बॅगच्यावतीने ११ हजार रोपांचे वाटप होणार

05 Jul 2019

शांतिनिकेतन सेवा प्रतिष्ठान व स्वामी बॅग्ज परिवार यांच्या संयुक्त विद्यमाने आषाढी एकादशी निमित्त क्षेत्र प्रती पंढरपूर विठ्ठलवाडी येथे यंदाच्याही वर्षी प्रसादरूपी वृक्षवाटपाची वारीची परंपरा जपत २० व्या वर्षी पदार्पण करीत आहोत. यावर्षी देखील आलेल्या भक्तांना,शेतकरी बांधवांना अनेक विविध प्रकारची देशी रोपांचे वाटप करण्यात येणार आहे.यात आंबा,फणस,पेरु,वड,चिंच,कडूनिंब,पिंपळ,औदुंबर,यासारखी निसर्गाला उपयुक्त वृक्ष,तसेच विविध प्रकारची फुलझाडे यांचे वाटप करण्यात येणार आहे. सादर कार्यक्रम हा आषाढी एकादशी शुक्रवार दिनांक १२ जुलै रोजी सिहगड रोडवरील क्षेत्र विठ्ठलवाडी येथे सकाळी ११ वाजता आयोजित केला आहे. यावेळी प्रतिष्ठानचे अध्यक्ष दीपक परदेशी,स्वामी बॅग्जचे राहुल जगताप,तसेच स्थानिक मान्यवर उपस्थित राहणार आहेत. 

 

Peoples Media Pune.

© 2011. Peoples Media Pune

http://www.peoplesmediapune.com | Powered By Easily Editable Business Website - Joysite