Peoples Media Pune header

Go Back

रोटरी ई क्लब ऑफ पुणे डायमंडच्या अध्यक्षपदी धनश्री जोग

10 Jul 2019

रोटरी प्रांत ३१३१ मधील एकमेव रोटरी ई क्लब ऑफ पुणे डायमंडच्या अध्यक्षपदी रो.धनश्री जोग यांची निवड करण्यात आली.मावळते अध्यक्ष सुनील सावरकर यांच्याकडून त्यांनी सूत्रे स्विकारली.सेक्रेटरीपदी प्रकाश सुतार यांची निवड झाली त्यांनी पवन जोशी यांच्याकडून सूत्रे स्विकारली.मराठा चेंबर्सच्या सुमंत मुळगावकर हॉल सेनापति बापट रोड यथे झालेल्या या कार्यक्रम प्रसंगी नियोजित प्रांतपाल रो. पंकज शहा.अडिशनल कलेक्टर दिनेश डोके.कोमल पवार,एमआयडीसीचे डायरेक्टर श्रीकांत बडवे,रोटरी ई क्लब ऑफ पुणे डायमंडच्या संस्थापक सुप्रिया बडवे,सूत्रसंचालक रामदास जैद,महेश पवार आदि मान्यवर उपस्थित होते.या प्रसंगी बोलताना फक्त व्यवसायचेच नव्हे तर सामाजिक कार्याचे सुद्धा योग्य नियोजन हवे असे संगितले.नवनिर्वाचित अध्यक्ष धनश्री जोग यांनी आगामी काळात युवकांना रोजगार,कौशल्य प्रशिक्षण इत्यादी विषयात जास्तीतजास्त रोजगार निर्मितीसाठी कार्य करणार असल्याचे संगितले.

छायाचित्र :धनश्री जोग 

 

Peoples Media Pune.

© 2011. Peoples Media Pune

http://www.peoplesmediapune.com | Powered By Easily Editable Business Website - Joysite