Peoples Media Pune header

Go Back

रोटरी क्लब पुणे इन्स्पिराच्या अध्यक्षपदी स्मिता विखणकर

10 Jul 2019

रोटरी क्लब पुणे इन्स्पिराच्या अध्यक्षपदी रो.स्मिता विखणकर यांची निवड करण्यात आली.मावळत्या अध्यक्षा ज्योति भंडारी यांच्याकडून त्यांनी सूत्रे स्वीकारली.सेक्रेटरीपदी रो.लक्ष्मीकांत गुमास्ते यांची निवड झाली त्यांनी रो. संगीता माळी यांच्याकडून सूत्रे स्वीकारली.खजिनदारपदी रो.हर्षदा विसपुते यांची निवड झाली.हॉटेल क्लार्क्स इन येथे झालेल्या या कार्यक्रम प्रसंगी नियोजित प्रांतपाल रो.रश्मी कुलकर्णी,प्रमुख पाहुणे मेजर जनरल विजय कुमार पिंगळे.सहाय्यक प्रांतपाल रो. व्ही.एस.श्रीनिवासन.माजी अध्यक्ष रो.पिनल वानखेडे,रो.चंद्रशेखर महामुनी आदि मान्यवरांच्या बरोबरच रोटरी सदस्य व कुटुंबिय उपस्थित होते. या प्रसंगी बोलताना रश्मी कुलकर्णी यांनी अनेकांनी एकत्र आल्यास मोठे सामाजिक कार्य होते.सर्वांनी एकत्र येवून गरजू लोकांसाठी सेवा प्रकल्प उभे करावेत असे संगितले.नवनिर्वाचित अध्यक्ष स्मिता विखणकर यांनी आगामी काळात निर्मल रक्षा अभियान,वृक्षारोपण,विद्यार्थ्यांना मदत असे उपक्रम राबविणार असल्याचे संगितले. 

 

Peoples Media Pune.

© 2011. Peoples Media Pune

http://www.peoplesmediapune.com | Powered By Easily Editable Business Website - Joysite