Peoples Media Pune header

Go Back

महेश प्रोफेशनल फोरम(पूर्व)च्या वतीने धर्मवीर संभाजी प्रतिष्ठानच्या वृद्धाश्रम व अनाथ आश्रमात विविध उपक्रम

14 Jul 2019

महेश प्रोफेशनल फोरमच्या(पूर्व) वतीने हडपसर येथील धर्मवीर संभाजी  प्रतिष्ठानच्या वृद्धाश्रम व अनाथाश्रमात विविध उपक्रम केले.यात १४० मुलामुलींना शालेय किट प्रदान करण्यात आले. १५ वृद्धाना दैनंदिन वापराचे किट प्रदान करण्यात आले.शाळेच्या वर्ग खोल्यांमध्ये छोट्या मुलांनी (सदस्यांच्या) भिंतीवर सुंदर रंगकाम केले.पर्यावरण संरक्षण व्हावे यासाठी परिसरात ५० वृक्ष लावण्यात आले. या उपक्रमात महेश प्रोफेशनल फोरमच्या सुमारे १०० सदस्यांनी सहभाग घेतला.या प्रसंगी धर्मवीर संभाजी प्रतिष्ठानचे संस्थापक मारुति आबा तुपे. महेश प्रोफेशनल फोरमचे अध्यक्ष सौरभ सोडानी,प्रीती भट्टड(कार्यक्रम संचालक),अतुल सिकची(सचिव),कृष्णा साबू(प्रसिद्धी प्रमुख),सुरेश मालानी,निलम अजमेरा,विनय बिहाणी आदि मान्यवर उपस्थित होते.या प्रसंगी बोलताना मारुति अण्णा तुपे यांनी समाजातील गरजू व्यक्तींना आपल्यापरीने सर्वांनी सहाय्य करावे असे आवाहन केले. स्नेहभोजनाने कार्यक्रमाची सांगता झाली.

छायाचित्र :वृक्षारोपन करतांना महेश प्रोफेशनल फोरम(पूर्व)चे सदस्य

 

Peoples Media Pune.

© 2011. Peoples Media Pune

http://www.peoplesmediapune.com | Powered By Easily Editable Business Website - Joysite