Peoples Media Pune header

Go Back

रोटरी क्लब्सच्या वतीने विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

14 Jul 2019

पुण्यातील विविध रोटरी क्लब ई डायमंड,युवा,कर्वेनगर,सेंट्रल,आणि सुपरमाइंड यांच्या संयुक्त विद्यमाने ९ वी व १० वीच्या विद्यार्थ्यांना सीबीएसई अभ्यासा विषयी मोफत मार्गदर्शन करण्यात आले.टिळक स्मारक मंदिर येथे झालेल्या या कार्यक्रम प्रसंगी माजी प्रांतपाल रो.डॉ.दीपक शिकारपूर.माधवी वझे(रोटरी प्रांत शिक्षण प्रकल्प), रो.सौजन्य देशमुख,रोटरी क्लब युवाचे अध्यक्ष राहुल गडकरी,रोटरी क्लब कर्वेनगरच्या अध्यक्ष रो.आशा अमोणकर,रोटरी क्लब ई डायमंड अध्यक्ष धनश्री जोग,रोटरी क्लब मिड ईस्ट अध्यक्ष संतोष घोणे,शिक्षण तज्ञ अ.ल.देशमुख,सुवर्णा कराडकर,सुपर माइंड संस्थेच्या द्या कुलकर्णी आदि मान्यवरांच्या बरोबरच विद्यार्थी व पालक मोठ्या संखेने उपस्थित होते.या प्रसंगी बोलताना दीपक शिकारपुर यांनी पालकांनी मुलांवर अवास्तव अपेक्षा लाडू न्येत,नवीन क्षेत्रे व अभ्यासक्रम येत आहेत त्यांत ही करियर करावे,आपली क्षमता ओळखून क्षेत्र निवडावे असे संगितले.    

छायाचित्र :विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना दीपक शिकारपुर 

 

Peoples Media Pune.

© 2011. Peoples Media Pune

http://www.peoplesmediapune.com | Powered By Easily Editable Business Website - Joysite