Peoples Media Pune header

Go Back

“रोटरी ही माणसे जोडणारी संस्था”,-पद्मश्री मिलिंद कांबळे.

17 Jul 2019

रोटरी ही सामाजिक सौहार्द व विकासाला कटिबद्ध असणारी व माणसे जोडणारी आंतरराष्ट्रीय संस्था असून अपटाऊन शाखेचे या वर्षीच्या नियोजित काश्मिरी युवकांसाठीचा  कौशल्य विकास प्रकल्प,यवतमाळ जिल्ह्यातील आत्महत्या केलेल्या शेतकर्‍यांच्या कुटुंबीयांना गोदान करून उत्पन्नाचे स्रोत निर्माण करण्याचा संकल्प खर्‍या अर्थाने गरजू व वंचित घटकांना न्याय देणारे आहेत.म्हणून सर्वांनी त्यासाठी सहकार्य केले पाहिजे”. असे प्रतिपादन डिक्कीचे संस्थापक पद्मश्री मिलिंद कांबळे यांनी रोटरीच्या अपटाऊन शाखेच्या नवनियुक्त अध्यक्ष अंजली देशमुख यांच्या पदग्रहण प्रसंगी केले.हिंदूजिमखाना येथील सभागृहात संपन्न झालेल्या सदर  कार्यक्रमाचे प्रमुख अतिथि रोटरीचे पुणे प्रांतपाल रो.रवी धोत्रे यांनी यावर्षी रोटरीचे ब्रीदवाक्य जगातील माणसे जोडणे हे आहे,त्यामुळे सर्व रोटेरियन्सनी नावीन्यपूर्ण समाजोपयोगी प्रकल्प हाती घेवून वंचित घटकांना न्याय द्यावा असे आवाहन केले. नवनियुक्त अध्यक्ष अंजली देशमुख यांनी आपल्या सर्व सहकार्‍यांचा परिचय करून दिला.या पदग्रहण समारंभास माजी प्रांतपाल संगणक शास्त्रज्ञ दीपक शिकारपूर,रो.डॉ.अविनाश भोंडवे,माजी संमेलनाध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख आदी मान्यवर उपस्थित होते.  

छायाचित्र :डावीकडून मिलिंद कांबळे,रवी धोत्रे,अंजली देशमुख 

 

Peoples Media Pune.

© 2011. Peoples Media Pune

http://www.peoplesmediapune.com | Powered By Easily Editable Business Website - Joysite