Peoples Media Pune header

Go Back

रोटरी मिड ईस्टच्या वतीने बांदोरवाला लेप्रसी हॉस्पिटल येथे रक्षाबंधन

17 Aug 2019

भारतीय संस्कृतीत रक्षा बंधन या सणांस प्राचीन काळा पासून महत्वाचे स्थान आहे.रोटरी क्लब मिडच्या वतीने बांदोरवाला लेप्रसी हॉस्पिटल,येवलेवाडी येथे रक्षाबंधन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.या वेळी कुष्ठ रुग्ण भगिनींनी रोटरी सदस्यांना राखी बांधली व रोटरी सदस्यांनी ही रुग्णांना राखी बांधली.या कार्यक्रम प्रसंगी रोटरी क्लब मिड ईस्टचे अध्यक्ष रो.संतोष घोणे,सेक्रेटरी रो.डॉ.राजेंद्र भवाळकर,घनश्याम इंचुरे,रुग्णालय प्रशासक मीरा भोये,डॉ.शहा,रोटरॅक्ट क्लब(युवा शाखा) मिड ईस्टचे अध्यक्ष दर्पण जाधव,सेक्रेटरी सौरभ पाटील,शुभम शेळके,आंचल हुबळी,तेजल शहा,सोनिया कुंभोजकर,हर्षद ईनामदार,संकेत नागपुरे आदि मान्यवर उपस्थित होते.रुग्णालयास आवश्यक बँडेज साहित्य प्रदान करण्यात आले,उपस्थितांना मिठाई वाटप व अल्पोपहाराने कार्यक्रमाची सांगता झाली.या प्रसंगी मीरा भोये यांनी येथील रुग्णांना मदती बरोबरच लोकांच्या संपर्काची गरज असल्याचे संगितले. 

छायाचित्र :रक्षाबंधन करताना रुग्ण भगिनी 

 

Peoples Media Pune.

© 2011. Peoples Media Pune

http://www.peoplesmediapune.com | Powered By Easily Editable Business Website - Joysite