Peoples Media Pune header

Go Back

आयएपीइएन पुणे विभागाचे उद्घाटन संपन्न.

01 Sep 2019

इंडियन असोसिएशन फॉर पॅरेनटेरल अँड एंटरल न्यूट्रिशनच्या पुणे विभागाचे उद्घाटन जहांगीर रुग्णालयाच्या सभागृहात संपन्न झाले. या पुणे विभागाच्या मानद अध्यक्षपदी डॉ.अनंतभूषण रानडे यांची नियुक्ती झाली.सौ.मेघा पटवर्धन यांची उपाध्यक्षपदी,सौ.सुचेता लिमये यांची सचिव पदी,सुश्री.ज्युली दत्तानी यांची कोषाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. समितीच्या इतर सदस्यपदी सुश्री.गायत्री काशेलकर,सुश्री. रिचा शुक्ला,सुयश भंडारी,सुश्री.श्रीशा गजरे,आणि सुश्री शितल तांबे यांचा समावेश आहे.या कार्यक्रमात भारतीय लोकसंखेतील कुपोषणाच्या मूल्यांकनासाठी आयएमड्ब्ल्यु टुल लॉच करण्यात आले.आहारातील तज्ञ आणि परिचरकाना या साधनाचा उपयोग आणि उपयोगिता याबद्दल समुदायात तसेच हॉस्पिटल सेटअप मध्ये सुयोग्य वापर करणेबाबत प्रशिक्षण देण्यात आले.सुचेता लिमये म्हणल्या प्रौढ कुपोषणाचे प्रमाण हे भारतातील दुर्लक्षित क्षेत्र आहे.मा. पंतप्रधान यांच्या फिट इंडिया मिशनला पुढे नेण्यासाठी आपल्याला भारतीय लोकसंखेचे पोषण मूल्यांकन करणे आवश्यक आहे.याकरिता आम्हाला न्यूट्रिशन सोसायटी ऑफ इंडिया,पुणे शाखा मदत करीत आहे.

छायाचित्र :दिपप्रज्वलन करताना अनंतभूषण रानडे,मेघा पटवर्धन,ज्युली दत्तानी,सुचेता लिमये व अन्य

 

Peoples Media Pune.

© 2011. Peoples Media Pune

http://www.peoplesmediapune.com | Powered By Easily Editable Business Website - Joysite