श्री ऑल इंडिया जैन कॉन्फरन्सच्या राष्ट्रीय अध्यक्षा विमल बाफना,पुणे शहर फूड असोसिएशनचे अध्यक्ष विनोद बाफना त्याचप्रमाणे राष्ट्रीय महिला पदाधिकारी सुषमा लुंकड,मंगला धोका,मनिषा चोरडिया,तृप्ति गुगलीया,निरंजना चुत्तर,शोभा लुंकड,आदी पदाधिकारीगण,तसेच महर्षिनगर सुरभी महिला मंडळ,सुभाषबाबू लुंकड,या सर्वांनी अखिल मंडई मंडळाने यावर्षी गणपतीमध्ये सादर केलेल्या २४ तीर्थंकरांच्या भव्य अशा देखाव्यास सादिच्छा भेट देवून त्याठिकाणी जाप करून भक्ति भावना करण्यात आली.या प्रसंगी सुचेता अण्णा थोरात व नागरिक उपस्थित होते.देशभरातील गणेशोत्सवात जैन धर्मातील २४ तीर्थंकर समावेश असलेला व जैन व हिंदू संस्कृतीचा मिलाप दर्शविणारा हा पहिलाच उपक्रम असल्याचे विनोद बाफना यांनी नमूद केले.
छायाचित्र :भेट देणारे पदाधिकारी व सदस्य
© 2011. Peoples Media Pune