Peoples Media Pune header

Go Back

रोटरी क्लब फॉरच्यूनच्यावतीने संगणक जमा करून पूरग्रस्त परिसरातील शाळांना प्रदान करणार

16 Sep 2019

 सांगली व कोल्हापूर पूरग्रस्त विभागांत गरजू शाळांना रोटरी क्लब पुणे फॉरच्यून व डेलिगेट इन्फोटेक सिस्टिम यांच्या संयुक्त विद्यमाने संगणक प्रदान करण्यात येणार आहे.यासाठी नागरिकांकडे पडून असलेले,वापरात नसलेले.काही प्रमाणात तांत्रिक बिघाड झालेले किंवा ज्याचा वापर आपण करणार नाही असे संगणक जमा करण्यात येतील.व संस्थेच्या खर्चाने दुरुस्त करून ते या शाळांना मोफत देण्यात येतील. यामुळे आपल्याकडील अनावश्यक ई वेस्ट कमी होऊन दुरुस्त संगणकांचा वापर विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी होईल.असे आवाहन रोटरी क्लब फोरच्यूनच्या सेक्रेटरी रो.सारिका रोडे यांनी पत्रकात केले आहे. आपल्याकडील संगणक देणगी स्वरुपात द्यावयाची असल्यास संस्थेमार्फत  गोळा करण्यात येतील.इच्छुक नागरिकांनी संपर्क 9011616615-विनायक पिंपळकर.  

 

Peoples Media Pune.

© 2011. Peoples Media Pune

http://www.peoplesmediapune.com | Powered By Easily Editable Business Website - Joysite