Peoples Media Pune header

Go Back

तीन रोटरी प्रांतच्या वतीने पाणी,व स्वच्छता संबंधी एक दिवासीय विन्स कार्यशाला संपन्न

16 Sep 2019

शालांमधील विद्यार्थी विद्यार्थिनींना स्वच्छतागृह,साफ पाणी व हातांची स्वच्छता या विषयावर मार्गदर्शन व या संबंधी  आवश्यक ती पूर्ण माहिती मिळावी यासाठी रोटरी प्रांत ३१३१,३१३२,व ३१७० या तीन प्रांतांच्यावतीने एकदिवसीय विन्स कार्यशाला संपन्न झाली. मारीगोल्ड हॉटेल चांदणीचौक यथे झालेल्या या कार्यशाळेचे संयोजन रोटरी क्लब निगडीने केले होते.या प्रसंगी रोटरी प्रांत ३१३१चे प्रांतपाल रो.रवी धोत्रे,रोटरी प्रांत ३१३२चे प्रांतपाल रो.सुहास वैद्य,रोटरी प्रांत ३१७०चे प्रांतपालरो.गिरीश मासूरकर,रो.प्रशांत देशमुख(व्हाईस गव्हर्नर २०१९ -२० रोटरी इंटरनॅशनल मेंबर नॅशनल कमिटी ऑफ रोटरी इंडिया लिटरसी मिशन).रोटरी क्लब निगडीचे अध्यक्ष रो.विजय काळभोर,प्रमुख पाहुणे विनोदभाई शहा(जनसेवा फाउंडेशन),रो.अर्चना टोपले(विंग्ज प्रोग्राम डायरेक्टर),माजी प्रांतपाल रमेश आगरवाल आदि मान्यवरांच्या बरोबरच विविध पदाधिकारी व रोटरी सदस्य उपस्थित होते. या कार्यक्रमात विविध सत्रा मध्ये विविध विषयावर मार्गदर्शन करण्यात आले.प्रांतपाल रो रवी धोत्रे यांनी रोटरीचे सेवा कार्य टळागाळात पोचले पाहिजे असे संगितले.रो.प्रशांत देशमुख यांनी स्वच्छतेसाठी कार्य करताना विद्यार्थ्यांच्या गरजा प्रथम जाणल्या पाहिजे असे संगितले.प्रांतपाल सुहास वैद्य यांनी पूरग्रस्त विभागात नियोजन करून सातत्याने उपक्रम राबविले पाहिजे असे संगितले.रो.विजय काळभोर यांनी या उपक्रमात सहाय्य करणार्‍या व्यक्ति व संस्थांचे आभार मानले.

छायाचित्र : कार्यशाळेचे उद्घाटन करताना मान्यवर 

 

Peoples Media Pune.

© 2011. Peoples Media Pune

http://www.peoplesmediapune.com | Powered By Easily Editable Business Website - Joysite