Peoples Media Pune header

Go Back

गणेशोत्सव निर्विघ्नपणे पार पडल्या बद्दल पोलिस बांधवांचा निलमताई गो-हे यांच्या हस्ते सत्कार.

19 Sep 2019

गणेशोत्सव निर्विघ्नपणे पार पडल्याबद्दल यासाठी अत्यंत परिश्रम घेणार्‍या पोलिस बांधवांचा विधानपरिषद उपसभापती आ.डॉ.निलमताई गो-हे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.कार्यक्रमाचे संयोजन महात्मा फुले मंडई प्रतिष्ठानचे अध्यक्ष बाळासाहेब मालुसरे यांनी केले.फरासखाना पोलिस स्टेशन येथे झालेल्या या कार्यक्रम प्रसंगी शिवसेना शहरप्रमुख संजय मोरे,राजेंद्र शिंदे,युवराज पारिख,सादीक पानसरे,हर्षद मालुसरे,हनुमंत दगडे,नितिन परदेशी,अमृत पठारे,सुदर्शना त्रिगुणाईत,डिसीपी.स्वप्ना गोरे,एसीपी.प्रदीप आफळे,एसीपी.सुधाकर यादव,पीआय.राम राजमाने,पीआय.चुडापा.पी.आय.कळसकर,आदि मान्यवरांच्या बरोबरच पोलिस अधिकारी व पोलिस मोठ्या संखेने उपस्थित होते.या प्रसंगी बोलताना डॉ.निलमताई गो-हे यांनी पोलिसांनी गणेशोत्सव काळात परवानगी,वाहतूक व्यवस्थापन सुरक्षा इत्यादि बाबत उत्तम कार्य केले.व अविरत सेवा केली.चांगली बाब म्हणजे पोलिस आता तंत्रज्ञान निपुण होत आहेत.त्यामुळे काम अचूक होते.सर्वसाधारण पणे पोलिसांचे आयोग्याकडे दुर्लक्ष होते.त्यांनी आरोग्य सांभाळावे.यासाठी जीम तसेच वाचनालय यासाठी आपण आमदार निधि देवू असे संगितले.डिसीपी स्वप्ना गोरे यांनी आपल्या कामाचे कौतुक झाल्यास कामाचा उत्साह वाढतो असे संगितले.बाळासाहेब मालुसरे यांनी योग्य कार्यास समाजाने प्रोत्साहन द्यावे यासाठी य कार्यक्रमाचे आयोजन केल्याचे संगितले.पोलिस बांधवांना भेट वस्तु प्रदान करण्यात आली.  

छायाचित्र :पोलिस बांधवांचा सत्कार करताना निलमताई गो-हे,बाळासाहेब मालुसरे व अन्य  

 

Peoples Media Pune.

© 2011. Peoples Media Pune

http://www.peoplesmediapune.com | Powered By Easily Editable Business Website - Joysite