Peoples Media Pune header

Go Back

गणेशोत्सवात रोटरीच्या वतीने पर्यावरण संरक्षण विषयक कार्य

24 Sep 2019

रोटरी ही ११४ वर्ष जुनी संस्था असून अनेक देशात तिचे १२ लाख सदस्य आहेत.३१३१ हा पुणे जिल्हा आहे.तिच्यातील पुणे जिल्ह्यातील काही तालुके रायगड जिल्ह्यातील काही तालुके समविष्ट आहेत.या ३१३१ जिल्ह्याचे पाच हजार सदस्य असून १३५ क्लब आहेत.सध्या गणपती उत्सवात प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ति तयार केल्या जातात.या काही हजार टन आपल्या नैसर्गिक पाण्याच्या स्रोतातुन विसर्जित केल्या जातात.तसेच त्यांचे रंग ही विषारी असतात.आणि त्यामुळे आपल्या पर्यावरनाची अतिशय हानी होते.जलचर मारतात,आणि आपल्या ड्रेनेज लाईन्सही या प्लास्टर ऑफ पॅरिसनी बंद होतात.प्लास्टर ऑफ पॅरिस शेकडो वर्ष पडून राहते त्याचे विघटन होत नाही.तसेच काही हारज टन निर्माल्य पाण्यात बुडवून पाणी दूषित केले जातय पर्यावरण वाचवा ही मोहीम रोटरी क्लबनी मोठ्या प्रमाणात अंगिकारली आहे.प्रथम प्रामुख्याने गांधी भवन या क्लबच्या सदस्यांनी रोटरी सदस्यांना शाडू मातीचा गणपती करण्यास शिकवण दिली व त्याचे विसर्जन घरीच होईल व नंतर ही माती त्या झाडात टाकण्यात येईल अशा तर्‍हेची शपथ घेण्यात आली.सर्व रोटरी सदस्यांनी जवळजवळ ४००० शाळेच्या विद्यार्थ्यांना प्रशिक्षित केल व त्यांच्या हातून या मूर्ति बनवल्या व घरीच विसर्जन करतील अशी त्यांच्याकडून शपथ घेववली.काही क्लबच्या सदस्यांनी मूर्तिदान घेतलं व प्लास्टर ऑफ  पॅरिसच्या मूर्तिच आणि परत ते  रंग देवून म्हणजेच आपण ज्याला रिसायकल म्हणतो त्या करण्यास दिल्या.त्या बुडवल्या गेल्या नाहीत आणि पाणी दूषित होवू दिले नाही.पनवेल ,पिंपरीचिंचवड ,हडपसर येथील सदस्यांनी निर्माल्याचे फार मोठ्या प्रमाणावर संकलन केल.पुण्यामध्ये युवा नावाचा रोटरी क्लब आहे.दरवर्षी गणपतीतील १० दिवस त्यांनी पटवर्धन बागेत एक रिकामा प्लॉट घेवून त्यात श्रेडर मशीन बसवल होत.त्यांना महापालिका ,सोसायट्या,मंडळ प्रामुख्याने दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्ट आणि हडपसर येथील देखील ६ रोटरी क्लब या सर्वांनी जवळजवळ १०० टन मिश्र निर्माल्य पाठवल त्यातून छाननी करून २० टन निर्माल्याच श्रेडर मशीन मधून ते बारीक केल आणि अडीच टन खत बनवल हे खत शेतकर्‍यांना फुकट देण्यात आले.पिंपरीचिंचवड येथील क्लब यात खास करून उल्लेख केला पाहिजे तो वालेकरवाडी या क्लब जे कायमच नदी स्वच्छता प्रकल्प राबवतात.त्यांनी विसर्जानाचे ४ दिवस विसर्जन घाटावर जावून तासन तास उभे राहून आणि विनंती करून नागरिकांना पाण्यामधे निर्माल्य टाकू दिले नाही आणि ते सगळे गोळा करून ते कंपोस्टसाठी दिले.या योगदानात मोठ्या प्रमाणामध्ये सदस्य,सोसायटी व मंडळानकडे फिरले घाटावर भर पावसात आंधरात तासनतास उभे राहिले,याच्या मध्ये ते,रोटरॅक्ट,यांच्या कुटुंब,मूल,बायकासर्व सहभागी होते.यासाठी आपापले कामधंदा कुटुंबाला देण्यासाठी वेळ हा सगळा त्यांनी पर्यावरणाच्या कामासाठी दिला.पनवेल मधले १२ क्लब यामध्ये सहभागी झाले होते.त्यांनी १५०० टन निर्माल्य हे पाण्यामधून जाण्याचे वाचविले.येथे जवळजवळ ७६ हजार नागरिकांशी भेटून त्यांचे प्रबोधन केले.निर्माल्य टाकू नये आणि नागरिकांनी सुद्धा याला प्रतिसाद दिला. तसेच जवळजवळ ५००० गणपतीच्या मूर्ति शाळांमध्ये शाडू मातीने बनविल्या असल्यामुळे प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ति पाण्यामध्ये होवू दिल्या नाही.आमच्या पुण्या बाहेरचे क्लब म्हणजे नारायणगाव,इंदापूर,भिगवण,वरकुटे,दौंड,आळेफाटा,जुन्नर,इथेही शाडूगणपती बनविण्यात आले.गणपती मूर्तिदान व निर्माल्यच खत करणे हे मोठ्या प्रमाणात राबविण्यात आले.यामुळे जवळजवळ ३०० टन निर्माल्यच पर्यावरनास हिताचे खत बनले आणि जवळजवळ ५००० प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ति पाण्यात विसर्जित न करण्यात आल्या.आमचे यावर्षीचे प्रांतपाल अशी ग्वाही देतात की ही कामाची सुरुवात आहे.असे काम निरंतर केले जाईल अशी माहिती रोटरी प्रांत ३१३१ चे प्रांतपाल रो.रवी धोत्रे आणि वॉटर प्रोजेक्ट डायरेक्टर डॉ.रो.मीनाक्षी बोराटे यांनी पत्रकार परिषदेत दिली.     

 

Peoples Media Pune.

© 2011. Peoples Media Pune

http://www.peoplesmediapune.com | Powered By Easily Editable Business Website - Joysite