Peoples Media Pune header

Go Back

कॉग्रेस कार्यकर्त्यांचा स्नेह मेळावा व स्नेहभोजन संपन्न

24 Sep 2019

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक नुकतीच जाहीर झाली आहे.त्यामुळे त्यासाठी वातावरण निर्मिती होत असून अनेक पक्ष व कार्यकर्ते जोमाने कार्यास लागले आहेत.या अनुषंगाने कॉग्रेस कार्यकर्त्यांचा स्नेहमेळावा व स्नेह भोजनाचे आयोजन करण्यात आले.पुणेशहर कॉग्रेस कामिटीचे वरिष्ठ उपाध्यक्ष बाळासाहेब दाभेकर यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले.या प्रसंगी आयोजक बाळासाहेब दाभेकर,माजी गृह राज्यमंत्री रमेश बागवे,बाळासाहेब शिवरकर,उल्हासदादा पवार,मोहनदादा जोशी,रोहितदादा टिळक,शांतीलाल सूरतवाला,संजय बालगुडे,मुख्तार शेख,गोपाळ तिवारी,जयसिंग भोसले,शिवा मंत्री,रवींद्र धंगेकर,नरेंद्र व्यवहारे,डॉ.सतीश देसाई,काका धर्मावत,रवींद्र धंगेकर आदि मान्यवरांच्या बरोबरच पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. या प्रसंगी बोलताना उल्हासदादा पवार यांनी बालेकिल्ला वाईगेरे काही नसते.कसबा विधानसभा मतदारसंघात अनेक नेते निवडून आले आहेत.भाजप विरोधी जनमत आहे.सर्व विरोधक एकत्र आले तर कॉग्रेस पराभूत होईल.ज्या कोणाला तिकीट मिळेल त्याला विजयी करण्यासाठी सर्वांनी काम करावे असे संगितले.बाळासाहेब दाभेकर हे कसबा विधानसभा निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक आहेत असंख्य कार्यकर्त्यांनी व मान्यवरानी याचे स्वागत केले. 

 

Peoples Media Pune.

© 2011. Peoples Media Pune

http://www.peoplesmediapune.com | Powered By Easily Editable Business Website - Joysite