Peoples Media Pune header

Go Back

“उदयनराजे यांच्या प्रतिष्ठशी खेळाल तर खबरदार” –संजय सावंत

24 Sep 2019

छत्रपतींचे वंशज उदयनराजे भोसले महाराज यांना भाजप पक्षामध्ये घेवून मराठा समाजाचे खच्चीकरण व माराठा आज मंगळवार दिनांक २४/९/१९ रोजी पुणे येथे मराठा क्रांती ठोक मोर्चाची राज्यस्तरीय पत्रकार परिषद पार पडली,महाराष्ट्र शासनाने आतापर्यंत केलेली मराठा समाजाची फसवणूक लक्षात घेता मराठा क्रांती ठोक मोर्चाचे राज्याचे समन्वयक यांनी पुणे येथे तातडीची पत्रकार परिषद बोलावली होती.त्या पत्रकार परिषदेमध्ये मराठा समाजाच्या आत्तापर्यन्त केलेल्या फसवणुकीच्या आशयानुसार मराठा समाजाच्या श्रद्धा सुद्रिक या बालिकेवरती झालेल्या बलात्काराच्या प्रकरणातील गुन्हेगार आरोपीला आत्तापर्यन्त फाशीची शिक्षा दिली नाही.मराठा आरक्षणासाठी आत्महत्या केलेल्या ४२ मराठा बांधवांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी दहा लाख रुपयांची मदत देण्याची घोषणा सरकारने केली होती तो शब्द पाळला नाही.आणि त्यानंतर मराठा समाजाचे श्रद्धास्थान समाजाचे छत्रपती असलेले उदयनराजे भोसले महाराज यांची मराठा समाजाच्या केलेल्या फसवणुकीप्रमाणे फसवणूक करू नये याची दक्षता सरकारने घ्यावी जर महाराजांची अशा प्रकारे फसवणूक केली तर राज्यातील सकल मराठा समाज पेटून उठल्याशिवाय राहणार नाही. मराठा समाजामध्ये सत्तेची पाच वर्षात भाजप सरकारने फक्त फुट पाडण्याचा प्रयत्न केलेला आहे.आता इथून पुढे असा प्रयत्न केल्यास मराठा समाज सरकारला त्याची जागा दाखविल्या शिवाय राहणार नाही अशा प्रकारचे वक्तव्य आज पत्रकार परिषदेमध्ये मराठा क्रांती ठोक मोर्चाचे राज्य समन्वयक संजय सावंत यांनी व्यक्त केले.यावेळी मराठा क्रांती ठोक मोर्चाचे राज्याचे समन्वयक महेश भैय्या डोंगरे,गजानन महाराज देठे,सतीश वेताळ,अमित घाडगे,बबन सुद्रिक,भगवान माकणे,बापूसाहेब शिरसाट,हरिभाऊ बोडके,अनिल देठे,अक्षय बाराहाते यांच्या सह असंख्य समाजबांधव उपस्थित होते. 

 

Peoples Media Pune.

© 2011. Peoples Media Pune

http://www.peoplesmediapune.com | Powered By Easily Editable Business Website - Joysite