Peoples Media Pune header

Go Back

रोटरी क्लब युवातर्फे “माईंड पॉवर”,विषयावर कार्यशाळा संपन्न.

27 Sep 2019

रोटरी क्लब ऑफ पुणे युवा तर्फे नुकतीच श्री सिद्धीविनायक महाविद्यालयामध्ये अकरावी व बारावीच्या विद्यार्थिनींसाठी “माईंड पॉवर” या विषयावर कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती.सौ मोनिका मोजकर या प्रख्यात माइंड ट्रेनर असून त्यांनी मुलींना सकारात्मक विचारसरणी,एकाग्रता याविषयावर मार्गदर्शन केले.तसेच त्यावर काही प्रात्यक्षिके सुद्धा सादर केली. विद्यार्थिनींनी यात सक्रिय सहभाग घेतला व सकारात्मक प्रतिसाद दिला. माइंड पॉवरचा (मनशक्ती)त्यांना भविष्यात अभ्यास,करियर व प्रत्यक्ष जीवनात सुद्धा खूप फायदा होईल यात शंका नाही.या कार्यशाळेच्या संयोजनासाठी सौ.मानसी धारप,सौ.मेघा गडकरी,सौ.दीपा बडवे,सौ.शलाका पाटसकर,व सौ.कविता पवार यांनी विशेष प्रयत्न केले.

छायाचित्र :कार्यशाळेत विद्यार्थिनी व मार्गदर्शक 

 

Peoples Media Pune.

© 2011. Peoples Media Pune

http://www.peoplesmediapune.com | Powered By Easily Editable Business Website - Joysite