Peoples Media Pune header

Go Back

रोटरी क्लब रॉयल व अन्य क्लबच्या वतीने गणेशोत्सवात महिला व पुरुषांसाठी स्वच्छता गृह उपक्रम

28 Sep 2019

मागील वर्षा प्रमाणे ह्या वर्षी ही गणेशोत्सवाच्या शेवटच्या ४ दिवसांसाठी महिला व पुरुषांसाठी सामाजिक जाणिवेतून रोटरी क्लब ऑफ पुणे रॉयल यांच्या तर्फे तात्पुरते सार्वजनिक शौचालय श्री यशवंत महाराज गणेश विसर्जन घाट,पुणे सेंट्रल मॉल जवळ उभारण्यात आले होते.गणपती बघायला आलेल्या भाविकांना निसर्गाच्या हाकेला ओ देण्यासाठी याची नितांत गरज असते.या जाणिवेतून आम्ही हा उपक्रम गेली २ वर्ष राबवित आहोत.याचे उद्घाटन सौ.जयश्री धोत्रे यांच्या हस्ते करण्यात आले.या उपक्रमात रोटरी क्लब रॉयल बरोबरच १)रोटरी क्लब ऑफ पुणे कोथरूड,२)रोटरी क्लब ऑफ पुणे स्पोर्ट्स सिटी,३)रोटरी क्लब ऑफ पुणे इन्स्पिरा ४)रोटरी क्लब ऑफ पुणे शिवाजीनगर.५)रोटरी क्लब ऑफ पुणे अपटाऊन,६)रोटरी क्लब ऑफ पुणे कर्वेनगर,७)रोटरी क्लब ऑफ पुणे शनिवारवाडा,८)रोटरी क्लब ऑफ पुणे नॉर्थ,९)रोटरी क्लब ऑफ पुणे वेस्ट,१०)रोटरी क्लब ऑफ पुणे डेक्कन,११)रोटरी क्लब ऑफ पुणे युनिव्हर्सिटी,१२)रोटरी क्लब ऑफ पुणे मेट्रो,१३)रोटरी क्लब ऑफ पुणे लोकमान्यनगर हे सहभागी झाले होते.

छायाचित्र :उद्घाटन प्रसंगी जयश्री धोत्रे व अन्य रोटरी पदाधिकारी  

 

Peoples Media Pune.

© 2011. Peoples Media Pune

http://www.peoplesmediapune.com | Powered By Easily Editable Business Website - Joysite