Peoples Media Pune header

Go Back

पुण्याच्या गायत्री अकोलकर यांना देशातील सर्वात तरुण महिला एनर्जी मॅनेजर पुरस्कार प्रदान

01 Oct 2019

सोसायटी ऑफ एनर्जी इंजिनियर्स अँड मॅनेजर्स(सिम)संस्थेच्यावतीने  देशातील सर्वात “तरुण महिला एनर्जी मॅनेजर”(बेस्ट परफॉर्मन्स अवॉर्ड वुमन एनर्जी मॅनेजर)हा पुरस्कार पुण्याच्या गायत्री अकोलकर यांना दिल्ली येथे नुकताच प्रदान करण्यात आला.देशातील त्या एकमेव महिला पुरस्कार प्राप्त आहेत.प्रमाणपत्र व स्मृतिचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप होते,हा समारंभ दिल्ली येथील सभागृहात संपन्न झाला.हा पुरस्कार त्यांना भारत सरकार दिल्लीचे ब्यूरो ऑफ एनर्जी एफिसियंन्सीचे डायरेक्टर सुनील खंडारे,एनर्जी एफिशीयंन्सी सर्व्हिस लिमिटेडचे श्रीयुत गरनाईक व चीन सरकारच्या चायना एनर्जी रिसर्च सोसायटीचे सेक्रेटरी जनरल मा डिंगपिंग यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.गायत्री अकोलकर या विद्युत विकास पुणेच्या संचालिका आहेत.त्या वीज बिल बचत कशी होवू शकते यावर मार्गदर्शन करतात. या कार्यक्रमास देशभरातील सुमारे ३०० हून अधिक प्रतिंनिधी उपस्थित होते.

छायाचित्र : पुरस्कार स्वीकारताना गायत्री अकोलकार

 

Peoples Media Pune.

© 2011. Peoples Media Pune

http://www.peoplesmediapune.com | Powered By Easily Editable Business Website - Joysite