Peoples Media Pune header

Go Back

गुंतागुंतीचे गरोदरपन व यशस्वी डिलिव्हरी.बाळ-बाळांतीन सुखरूप

05 Oct 2019

दिनांक २८/८/२०१९.पेशंट- किशोरी सचिन निवंगुणे,वय २७ वर्ष.असून त्यांची पहिली प्रेग्नंसी होती,त्री त्यांना अचानक पोत दुखणे व उलट्या होणे हा त्रास सुरू झाला.दिनांक २८/९/२०१९ रोजी साधारण रात्री ८.०० च्या सुमारास नातेवाइकांनी पेशंटला “आधार मल्टीस्पेशालिटी” हॉस्पिटल मध्ये आणल्या नंतर डॉक्टरांनी तपासले असता;पेशंटचा ब्लड प्रेशर १८०/११० जास्त होता.व प्रेग्नन्सिचे फक्त ८ महीने पूर्ण झाले होते.रुग्णाचे नातेवाईक त्या कालावधीमध्ये घाबरलेले आणि चिंतेमध्ये होते.ज्या हॉस्पिटलमधून आधार हॉस्पिटलमध्ये आणले त्या हॉस्पिटलमध्ये आई व बाळ दोघांचीही प्रकृती अतीचय चिंताजनक आहे,व काहीही होवू शकते असे सांगितल्याने नातेवाईक चिंतातुर अवस्थेत होते.पेशंटचे रजिस्ट्रेशन आधार मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलला नसतानाही प्रसंगाचे गांभीर्य लक्षात घेवून आणि त्या पेशंटची प्रकृती पाहून क्षणाचाही विलंब न करता डॉक्टर मंदार रानडे यांनी पेशंटला अतिदक्षता विभागात अॅडमिट करून घेतले.पेशंटला लघवीवाटे रक्तस्राव होत होता.व पेशंटचे हृदयाचे ठोके १४०/minम्हणजेच खूप वाढले होते. व पेशंटचा रिपोर्ट पाहता पेशंटला HELLP SYNDROME म्हणजेच (H=Hemolysis,E=Elevated liver-Enzymes, l=low platlet count)व Pre-Eclampsia आढळून आले.व पेशंटच्या लिव्हरवर सूज होती व पेशंटला Ascites म्हणजेच पोटात पाणी भरलेले होते. 

     HELLP हा आजार जीवघेणा असतो व त्या आजारामध्ये रक्तस्राव होणे,किडणीवर सूज येणे,पेशंटला श्वासाला त्रास होणे,placental Abruption होणे व तसेच बाळाच्या जिवास धोका असणे या बाबी या आजारात होत्या.आधार मल्टीस्पेशलिटी हॉस्पिटल मधील डॉक्टरांनी पेशंट व बाळाचा जीव वाचविण्यासाठी तातडीने “सिजेरियन सकेशन”(LSCS) करण्यासाठी स्रिरोग तज्ञ डॉक्टर मंदार रानडे,बालरोगतज्ञ डॉक्टर तेजस तांदळे व भूलतज्ञ डॉक्टर अभय सांचेती यांना बोलावले.व ऑपरेशनची पूर्ण तयारी केली.डॉक्टर मनीष कोलगे(MDphysician)यांनी पेशंटचा Bp कमी केला व अवघ्या काही वेळातच ऑपरेशन सुरू केले.

     आधार मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये Blood-Bank असल्यामुळे पेशंटला लागणारे रक्तपिशवी त्वरित उपलब्ध झाल्या.ऑपरेशन दरम्यान पेशंटला 1 bag Pcv तसेच 4 bag,1 Bag cryoprecipitate त्वरित चढवण्यात आले.2 तासांच्या अथक प्रयत्ना नंतर डॉक्टर रानडे व इतर सहकार्‍यांच्या परिश्रमांना यश आले.आई व बाळ दोघांचा जीव वाचवून ऑपरेशन व्यवस्थित पार पडले.

     तरी बाळाचे वजन ९६० ग्राम असल्याने बाळाला NICU अतिदक्षता विभाग दिनानाथ मंगेशकर हॉस्पिटलला रुग्णवाहिकेद्वारे हलविण्यात आले व पेशंट किशोरी निवंगुणेला ऑपरेशन नंतर अतिदक्षता विभागात चार दिवस ठेवून स्टेबल केले. व पेशंटला ४/१०/१९ रोजी डिस्चार्ज करण्यात आले.

     जीवघेण्या आजारातून पेशंटला वाचविल्याबद्दल  डॉ. मंदार रानडे,डॉ.मनीष कोलगे,डॉ.अभय सांचेती.व डॉ.तेजस तांदळे त्याचप्रमाणे इतर सहकारीवर्ग यांचे डॉ.दीपक शिंदे,डॉ.महेश दरेकर व पेशंटच्या नातेवाईकांनी अभिनंदन केले.   

 

Peoples Media Pune.

© 2011. Peoples Media Pune

http://www.peoplesmediapune.com | Powered By Easily Editable Business Website - Joysite