Peoples Media Pune header

Go Back

अग्रदूत बंग(बंगाली)समाजाचा सार्वजनिक दुर्गा महोत्सव संपन्न

06 Oct 2019

अग्रदूत बंग(बंगाली) समाजाच्या वतीने निओन आयटी पार्क खराडी येथील पीएमसी अॅमिनिटी मैदान येथे सार्वजनिक दुर्गा महोत्सव साजरा करण्यात आला.४ ऑक्टोबर ते ८ ऑक्टोबर या कलावधीत संपन्न झालेल्या या उत्सवात धार्मिक विधी,संस्कृतिक व सामाजिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते.यात रक्तदान शिबीर,अवयवदान,वृक्षारोपण,अनाथ आश्रमातील मुलांची आरोग्य तपासणी,शालेय वस्तु वाटप,थॅलेसेमिया व कर्करोग जनजागृती,तसेच रोज २५०० लोकांना मोफत अन्नदान याचा समावेश होता. या कार्यक्रमात अग्रदूत बंग समाजाचे अध्यक्ष बबलू मायती,अनिरबन सरकार(उद्योजक),कमल घोष आदि मान्यवर सहभागी होते. हजारो नागरिकानी यात सहभाग घेतला.

छायाचित्र :दुर्गा माता मूर्ति समोर अग्रदूत बंग समाज मान्यवर व सदस्य

 

Peoples Media Pune.

© 2011. Peoples Media Pune

http://www.peoplesmediapune.com | Powered By Easily Editable Business Website - Joysite