Peoples Media Pune header

Go Back

नात्यांनी उलगडले –बंध स्वरांचे.

07 Oct 2019

फिनिक्स कन्स्ट्रक्शन व M स्क्वेअर इंजिनियर्स प्रस्तुत गायन वादन आणि नृत्याविष्कार यांनी सजलेली अनोखी भाव संध्या रसिक श्रोत्यांच्या प्रचंड प्रतिसादात पुण्यातील नातू सभागृहात पार पडली.निमित्त होते.पारिवारीक एकत्रीकरणाचे आणि त्यातून उलगडणार्‍या “स्वरानुबंधांचे”.अर्थात बोकिल परिवारातील सदस्य आपल्या कौटुंबिक,व्यावसायिक जबाबदा-या पार पाडत आपली कला सुद्धा अतिशय उत्तम प्रकारे जोपासून तिला दर्दी लोकांच्या गर्दी पुढे सहजरित्या सादर करतात व वाहवा मिळवतात.असा हा अनोखा भाव संगम अर्थात स्वरानुबंध.या कार्यक्रमात भरतनाट्यम व कथ्थक नृत्याबरोबर हिंदी चित्रपट संगीत,भावगीत,भक्तीगीत,लावणी,लोकगीत,असे वेगवेगळे संगीत प्रकारही सादर झाले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ.राधिका व सौ.मीरा यांनी केले.पुण्यातील नावाजलेले उद्योजक स्वानंद जवळेकर,व मोहन अंतुरकर यांनी सर्वांशी संवाद साधला.गायत्री पाटसकर यांनी सर्वांचे आभार मानले.तर पाटसकर,जवळेकर,जातेगावकर,असलेकर,नातू,अंतुरकर,परांजपे,जोग,पंडित ,पानसरे,बोकील परिवारातील अर्थात एकाच वंशावळीतील विविध कलाकार यात सहभागी झाले होते. कार्यक्रमाचा शेवट अवघा रंग एक झाला या भैरवीने झाला.

छायाचित्र :कार्यक्रमातील सहभागी परिवारातील कलाकार 

 

Peoples Media Pune.

© 2011. Peoples Media Pune

http://www.peoplesmediapune.com | Powered By Easily Editable Business Website - Joysite