Peoples Media Pune header

Go Back

मुंबई आर्ट फेअर मध्ये पुण्यातील चित्रकारांच्या चित्रास उत्तम प्रतिसाद.

16 Oct 2019

)  नुकत्याच मुंबई येथे नेहरू सेंटर मधील मुंबई आर्ट फेअर मध्ये पुण्यातल्या चित्रकारांनी आपली कला प्रदर्शित केली.बी एम आर्ट गॅलेरीचे आर्टिस्ट भास्कर मंदोलू यांच्या मार्गदर्शनाखाली विविध विषयावर चित्र सादर केली.अनेक नामांकित आर्किटेक्ट,आर्टिस्ट,कलाप्रेमी आणि गॅलेरीज यांनी त्यांच्या चित्रांची स्तुति केली.प्रतिमा अभंगे यांनी आध्यात्मिक प्रेरणेने सिमरन समाधी,आनंद अनिकेत व सुरभी गोपिका असे चित्र सादर केले.मिहिका भट्ट यांनी ह्रिदम आणि म्युटेबल डेस्टिनी असे रंगीबेरंगी चित्र दर्शविली.श्रुती येवले यांनी त्यांची कला बुद्ध व अमृता बोंदरे यांनी मोटर बाईक सिरिज प्रस्तुत केली.कांचन भुसारी यांनी त्यांचे ग्रामोफोन व धनगर प्रस्तुत केला. श्वेता रुकमे  यांनी गणपती व इतर विविध चित्रे प्रस्तुत केली.संगीता झूरंगे यांनी चहा किटली असे सिरिज प्रस्तुत करून उपस्थितांची मने जिंकली.पुजा थिटे यांनी मसाई ही आफ्रिकन संस्कृतीची सिरिज केली.पराग म्हसवडे यांनी राजस्थानी चित्रे  प्रस्तुत केली.आर्टिस्ट भास्कर मंदोलू यांनी त्यांचे सुंदर फुलांचे फ्रोजन लव्ह व एबस्ट्राक्ट प्रदर्शित केले.यासर्वांच्या चित्रांसप्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला.  

छायाचित्र : आर्टिस्ट भास्कर मांडालू यांचे “फ्रोजन लव्ह”चित्र 

 

Peoples Media Pune.

© 2011. Peoples Media Pune

http://www.peoplesmediapune.com | Powered By Easily Editable Business Website - Joysite