रोटरी क्लब कर्वेनगरला विश्वमाता फाउंडेशनच “राज्यस्तरीय विश्वरत्न पुरस्कार”सामाजिक सेवा क्षेत्रासाठी प्रदान करण्यात आला.हस्ते आ.संग्रामदादा जगताप,बालगंधर्व रंगमंदिर येथे झालेल्या या कार्यक्रम प्रसंगी विश्वमाता फाऊंडेशनचे अध्यक्ष शिवाजी घाडगे,रोटरी क्लब कर्वेनगरच्या अध्यक्ष रो.आशा आमोणकर,रो.सचिन आमोणकर,सेक्रेटरी रो.आकांक्षा पुराणिक,डॉ.दिलीप कुलकर्णी,मनीषा पुराणिक,नितिन कुलकर्णी,रो.शिरीष पुराणिक,आ.संग्रामदादा जगताप,डॉ.रामचंद्र साबळे,डॉ.दत्ता कोहिनकर आदि मान्यवरांच्या बरोबरच विविध क्षेत्रांतील मान्यवर व नागरिक उपस्थित होते.शाल,श्रीफल,मानपत्र व स्मृतिचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप होते.या प्रसंगी बोलताना शिवाजी घाडगे यांनी मोठ्या व्यक्तींचा सत्कार एसआरडब्ल्यूटीआर होतो मात्र त्यांच्या माता पिता,गुरुजन व सामाजिक संस्था यांचा गौरव करण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन केले असल्याचे संगितले.सत्काराला उत्तर देतांना आशा आमोणकर यांनी रोटरी करीत असलेल्या सेवाकार्याची समाजाने दखल घेतल्याचा आनंद झाला असून आगामी काळातही असेच कार्य करावे याची प्रेरणा मिळाली असल्याचे संगितले.अजय धोटे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.
छायाचित्र :पुरस्कार स्वीकारताना आशा आमोणकर व सहकारी
© 2011. Peoples Media Pune