Peoples Media Pune header

Go Back

“रोटरी ग्रामविकास संघटना असंख्य गावांच्या विकासात भरीव कार्य करू शकते”.पोपटराव पवार.

11 Nov 2019

रोटरी क्लब ही संस्था खेडोपाडी व दुर्गम भागातही असंख्य गावांचा विकास करीत आहे व आगामी कळात ही करू शकेल,कारण खेड्यांचा विकास झाला तर रोजगारासाठी शहाराकडे येणारे लोंढे थांबतील आणि गाव व शहर दोघांचा समतोल होवून देशाची प्रगती होईल असे प्रतिपादन हिवरे बाजारचे आदर्श सरपंच पोपटराव पवार यांनी केले”.रोटरी व ग्रामस्थ यांच्या संयुक्त सहभागाने कार्य करीत असलेल्या “रोटरी ग्रामविकास सभा(रोटरी कम्युनिटी कॉर्पस)च्या सदस्यांची परिषद नुकतीच मराठा चेंबर्स टिळकरोड येथील सभागृहात संपन्न झाली.त्या प्रसंगी ते बोलत होते.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रांतपाल रो.रवी धोत्रे,माजी प्रांतपाल प्रशांत देशमुख,डिस्ट्रिक्ट चेयर मारुतराव जाधव,को चेयर अनंत तिकोने,कन्व्हेनर क्रांति शहा,रोटरी स्पोर्ट सिटीचे अध्यक्ष विनोद पाटील,सागर पडगिलवार,मिना बोराटे,सतीश खाडे,व जिल्हा भरातून आलेले रोटरी कम्युनिटी कॉर्पस(रोटरी ग्राम विकास सभा)चे सदस्य उपस्थित होते.यावेळी मा.पोपटराव पवार व रवी धोत्रे यांच्या हस्ते १८ नवीन समित्यांना मान्यता देण्यात आली.त्यांना सन्मानित करण्यात आले.सदस्यांनी आपले अनुभव कथन केले.व यासंबंधी पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले.कार्यक्रमाचे आयोजन रोटरी क्लब कॅम्पने केले,सूत्रसंचालन क्रांति शहा यांनी केले तर आभार प्रदर्शन रों.शीतल लोखंडे यांनी केले.

छायाचित्र :मान्यवर व सदस्य यांचे समूहचित्र 

 

Peoples Media Pune.

© 2011. Peoples Media Pune

http://www.peoplesmediapune.com | Powered By Easily Editable Business Website - Joysite