Peoples Media Pune header

Go Back

“ट्रोलिंग बाबत पोलिस डिपार्टमेंटचा सायबर सर्व्हेलंस सोशल मिडियावर हवा”.- ना.डॉ.नीलम गो-हे.

04 Jan 2020

ट्रोलिंग बाबत सायबर सेलच्या पोलिस डिपार्टमेंटचा सायबर सर्व्हेलंस(देखरेख)सोशल मिडियावर हवा,अनेकदा फेसबुक वा अन्य मिडियावर धमकी,रेप करू असे व अन्य बाबी येतात आशा वेळी तक्रार आल्यानंतर तपास करण्या एवजी पोलिस डिपार्टमेंटने स्वत: दखल घ्यावी.किमान अशा धमकी बाबत “आपली नोंद”पोलिस घेत आहेत असे कळवावे.म्हणजे अशा बाबी कमी होतील.”असे प्रतिपादन विधानपरिषद उपसभापति ना.डॉ.नीलम गो-हे यांनी केले.त्या स्री आधार केंद्र व महाराष्ट्र राज्य महिला आयोग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित “महिला डिजिटल साक्षरता या विषयावर आयोजित १ दिवसीय कार्यशाळेत मार्गदर्शन करतांना बोलत होत्या.महाराष्ट्र साहिती परिषद येथे झालेल्या या कार्यक्रम प्रसंगी संदीप गादीया(सायबर क्राइम इन्व्हेस्टिगेशन एक्स्पर्ट),सागर पडवळ(पोलिस-सायबर क्राइम),अपर्णा पाठक(स्री आधार केंद्र विश्वस्त),अपर्णा पाठक(स्री आधार केंद्र),मच्छिंद्र पंडित(सायबर क्राइम),सोनिया बेदी,मीना सावंत(महाराष्ट्र राज्य महिला आयोग),अस्मिता गायकवाड,रमेश शेलार,अनीता शिंदे,आदी मान्यवरांच्या बरोबरच विविध संस्थांचे प्रतींनिधी उपस्थित होते.या प्रसंगी मार्गदर्शन करतांना संदीप गादिया यांनी सायबर क्राइम म्हणजे काय ते कसे होतात व त्यांच्या पासून बचाव कसा करावा या बाबत सविस्तर माहिती प्रात्यक्षिकासह दिली.पोलिस निरीक्षक सागर पडवळ यांनी सायबर क्राइमच्या तपासा संबंधी माहिती दिली.ते म्हणाले यात महिलांचे नाव जाहीर करण्यात येत नाही,तसेच फेसबुक-व्हाट्सअपवर  सगळेच खरे नसते.व यात फसवणूक होवू शकते म्हणून माहीत नसलेल्या व्यक्तींना आपली माहिती देवू नये असे संगितले या कार्यक्रमात गटचर्चा घेण्यात आल्या तसेच उपस्थितांच्या प्रश्नांना मान्यवरांनी उत्तरे दिली.

 

Peoples Media Pune.

© 2011. Peoples Media Pune

http://www.peoplesmediapune.com | Powered By Easily Editable Business Website - Joysite