Peoples Media Pune header

Go Back

पुण्याच्या नवनिर्वाचित कारभा-यांचा शाहीर हिंगे लोककला प्रबोधिनी व नटरंग अॅकॅडमी तर्फे सत्कार.

13 Jan 2020

विद्येचे माहेरघर व संस्कृतिक राजधानी असलेल्या पुण्यनगरीत पुणे महानगरपालिकेत नव्याने नियुक्त कारभारी सदस्यांचा सत्कार शाहीर हिंगे लोककला प्रबोधिनी व नटरंग अॅकॅडमी यांच्या संयुक्त विद्यमाने स्वामी विवेकानंद जयंतीचे औचित्य साधून करण्यात आला.नानावाडा येथे संपन्न झालेल्या या कार्यक्रमात पुण्याच्या स्थायी समितीचे अध्यक्ष नगरसेवक हेमंत रासने,पुण्याच्या पहिल्या महिला उपमहापौर सौ.सरस्वतीताई शेडगे यांचा सत्कार माजी हवाईदल प्रमुख भूषणजी गोखले(निवृत्त)यांच्या हस्ते करण्यात आले या प्रसंगी आयोजक हेमंतराजे मावळे(शाहीर हिंगे लोककला प्रबोधिनी),जतीन पांडे(नटरंग अॅकॅडमी)आदि मान्यवरांच्या सोबत कलाकार,विद्यार्थी व नागरिक उपस्थित होते.या शाल,श्रीफळ व स्मृतिचिन्ह असे सत्काराचे स्वरूप होते.या प्रसंगी बोलताना शाहीर हेमंत मावळे यांनी पुणे संस्कृतिक क्षेत्रांत मागे पडत आहे.दिग्गज कलाकारांना पूर्वी मनपा कडून पुरस्कार-सन्मान प्रदान करण्यात येत होते. त्यातील पुरस्काराची रक्कम बंद झाली आहेत. शाहीर हिंगे यांच्या नावाने मान्यवर दिग्गजांना “शाहीर हिंगे पुरस्कार” मनपाच्या वतीने देण्यात यावा अशी अपेक्षा व्यक्त केली.सत्काराला उत्तर देताना हेमंत रासने यांनी आगामी काळात मनपाच्या सहाय्याने कंपन्या कडून सीएसआर फंडातून ही योजना राबविण्याचा प्रयत्न करणार असल्याचे संगितले.यावेळी कलाकारांनी विविध कला सादर केल्या.जतीन पांडे यांनी आभार प्रदर्शन केले.

छायाचित्र :डावीकडून जतीन पांडे,हेमंत रासने,सरस्वतीताई शेडगे,भूषण गोखले व हेमंत मावळे. 

 

Peoples Media Pune.

© 2011. Peoples Media Pune

http://www.peoplesmediapune.com | Powered By Easily Editable Business Website - Joysite