Peoples Media Pune header

Go Back

प्रेक्षकांना विचार करण्यास प्रवृत्त करणारी 'वेगळी वाट' लवकरच रुपेरी पडद्यावर

22 Jan 2020

मराठी चित्रपटांचे आशय-विषय हे नेहमीच प्रेक्षकांना विचार करण्यास भाग पाडतात. चित्रपट हे एक प्रभावी माध्यम असून विशेषतः मराठी चित्रपट बऱ्याचदा मनोरंजनातून समाजप्रबोधनही घडवतात असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही. इमॅजिनिट प्रॉडक्शन्सने नेमकी हीच बाब हेरत 'वेगळी वाट' हा आगामी मराठी चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस आणला आहे. जयश्री शाह आणि तुषार शाह प्रस्तुत 'वेगळी वाट' या चित्रपटकाचे लेखन-दिग्दर्शन अच्युत नारायण यांनी केले आहे कुटुंबाचा प्रमुख हा काळानुसार बदलणारा आणि प्रतिकूल परिस्थितीला अनुकूल करण्यावर नेहमीच भर देतो. 'वेगळी वाट' असाच एक संवेदनशील विषय प्रेक्षकांसमोर मांडला आहे. नुसतेच व्यवहारज्ञान नाही तर शिक्षणाच्या जोडीने माणूस एक ना अनेक मार्ग धुंडाळू शकतो हे सांगणारा. वेगळी वाट' या चित्रपटात योगेश सोमण प्रेमळ शिक्षकांच्या भूमिकेत आणि गीतांजली कुलकर्णी ह्या त्यांच्या पत्नीच्या भूमिकेत दिसतील. शाळेतील एका विद्यार्थिनीवर आपल्या मुलीपेक्षा अधिक प्रेम करणारे तिला जगण्याची योग्य दिशा दाखवणारे असे हे सर आणि ... मॅडम तिला कोणती 'वेगळी वाट' दाखवतील हे पाहणं रंजक ठरेल. चित्रपटात वडील-मुलीच्या नात्यातली हीच भावनिक गुंतागुंत दाखवण्यात आली आहे. शरद जाधव आणि अनाया फाटक यांच्यावर आधारलेली ही वडील-मुलीची आगळी-वेगळी गोष्ट प्रत्येकाच्या डोळ्यांत पाणी आणल्याशिवाय राहणार नाही. नीता दोंदे ह्या अनायाच्या आईच्या 'वेगळी वाट' या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिका आहेत. अच्युत नारायण आणि आशिष राखुंडे यांनी लिहिलेली 'वेगळी वाट'ची मनःस्पर्शी पटकथा वडील आणि मुलीच्या नात्यावर आधारलेली आहे. एका सुखी चौकोनी कुटुंबाचा जीवनप्रवास रेखाटणारा हा चित्रपट प्रेक्षकांना अंतर्मुख करेल यात काहीच शंका नाही. या चित्रपटाचे छायांकन शकील खान यांचे आहे तर मंसूर आजमी यांचे संकलन, विजया शंकर, डॉ. दिनेश अर्जुना यांचे संगीत आणि सुनील सिंह यांचे पार्श्वसंगीत असून 'वेगळी वाट '७ फेब्रुवारीपासून आपल्या भेटीस येणार आहे.

 

Peoples Media Pune.

© 2011. Peoples Media Pune

http://www.peoplesmediapune.com | Powered By Easily Editable Business Website - Joysite