Peoples Media Pune header

Go Back

जानेवारी महिन्यातील पोषण महिन्या निमित्त इंडिया असोसिएशन ऑफ पेरेंटल अँड न्यूट्रिशन यांच्यातर्फे यकृत प्रत्यारोपण व त्या दरम्यानचा आहार या विषयावर आहारतज्ञानसाठी परिसंवाद संपन्न.

27 Jan 2020

पोषण महिन्या निमित्त आयएपीइएन पुणे शाखेच्या वतीने यकृत प्रत्यारोपण व त्यावरील आहार यावर खास आहार तज्ञानसाठी २५ जानेवारी २०२० रोजी दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल येथे परिसंवाद आयोजित केला होता अशी माहिती या असोसिएशनच्या पुणे शाखेचे सहकार्यवाह आहारतज्ञ सुचेता लिमये यांनी दिली.तसेच त्यांनी सांगितले की ही असोसिएशन नेहमीच आहारशास्त्र या विषयातील आधुनिक संशोधन व सेवा या विषयावर मार्गदर्शन करण्याचे मोलाचे काम करते.आज-काल भारतामध्ये यकृत प्रत्यारोपण शस्त्रक्रिया करण्याचे प्रमाण वाढले आहे.व पुण्यामध्ये ही यांची संख्या वाढत चालली आहे.सहयाद्री हॉस्पिटलचे प्रसिद्ध यकृत प्रत्यारोपण शल्यविशारद डॉक्टर बिपिन विभुते यांनी ही शस्त्रक्रिया व रुग्णांना होणारा त्याचा लाभ यावर मार्गदर्शन केले.तेव्हा अध्यक्षपदी दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलचे प्रसिद्ध यकृत प्रत्यारोपण तज्ञ डॉक्टर निनाद देशमुख हे उपस्थित होते.त्यांनीही यावरील चर्चासत्रामध्ये भाग घेवून मार्गदर्शन केले.सौ.आर्ती गोखले यांनी अवयव प्रत्यारोपणाचे नियम व कायदे यांची माहिती सांगितली.कोलंबिया एशिया रुग्णालयातील आहार विभागाच्या प्रमुख आहारतज्ञ आरती भालेराव यांनी यकृत प्रत्यारोपणाचे आधी रुग्णांचा आहार कसा असावा,शस्त्रक्रियेपूर्वी आहारात काय बदल करावेत.तसेच शस्त्रक्रियेनंतर चा आहार कसा असावा यावर माहिती दिली.याबरोबरच यकृताचे आजार टाळण्यासाठी आहार कसा ठेवावा याचे मौलिक मार्गदर्शन केले.तसेच आयएपीइएन असोसिएशनच्या भारताच्या सहकार्यवाह पदी असणार्‍या डॉक्टर मानसी पाटील यांनी या २०२० मधील जागतिक आधुनिक क्लिनिकल न्यूट्रिशन मधील शोध यावर मार्गदर्शन केले.तसेच या असोसिएशनने ईएसपीइएन या जागतिक संस्थेसोबत मिळून लाईफलॉन्ग लर्निंग प्रोग्राम कशा प्रकारे राबवत आहे. याचा प्रत्येक आहार तज्ञाना लाभ कसा घेता येईल याबाबत संवाद साधला.या परिसंवादाचा लाभ पुण्यातील पन्नास पेक्षा जास्त आहार तज्ञांनी घेतला.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आहारतज्ञ संजाली एकतपुरे यांनी केले तर समारोप गायत्री कुलकर्णी यांनी केला 

 

Peoples Media Pune.

© 2011. Peoples Media Pune

http://www.peoplesmediapune.com | Powered By Easily Editable Business Website - Joysite