Peoples Media Pune header

Go Back

रोटरी क्लब बाणेरच्या वतीने श्री नागेश्वर विद्यालयाच्या नूतनीकरण भूमिपूजन समारंभ संपन्न.

04 Feb 2020

छत्रपती शिवाजी महाराजांनी रायरेश्वरावर स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली.त्या गडाच्या पायथ्याशी असलेले दुर्गम व अतिचय निसर्गरम्य असे गाव आंबवडे.(पुण्यापासून ६५ किमी.).आशा या आंबवडे गावातील श्री.नागेश्वर विद्यालयाच्या नुतनीकरणाच्या पहिल्या टप्प्याचे भूमिपूजन रोटरी क्लब ऑफ पुणे पाषाणच्या वतीने डॉ.रो.मीनाताई बोराटे(रोटरी डिस्ट्रिक्ट हॅपी स्कूल कमिटी)यांच्या हस्ते करण्यात आले.या प्रसंगी प्रमुख पाहुणे रो.लता केरकर(एजी रोटरी ३१३१),रोटरी क्लब बाणेरचे अध्यक्ष रो.कमलेश फेरवानी,सेक्रेटरी रो.नितिन वाघ.मुख्याध्यापक शिंदे सर,माजी मुख्याध्यापक पाटील सर,सरपंच रामदास जेधे,उमेश रिसबुड,आदि मान्यवरांच्या बरोबरच रोटरी सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते.या प्रसंगी बोलताना डॉ॰रो.मिनाताई बोराटे यांनी या परिसरातील ग्रामस्थांच्या पूर्वजांनी इतिहास काळात मोठी कामगिरी बजावली आहे असे संगितले.कमलेश फेरवानी यांनी साधनसामुग्री अल्प असतांनाही येथील विद्यार्थ्यानी केलेली प्रगती स्तुत्य आहे व आगामी काळात आवश्यक त्या सुविधा देण्याचा प्रयत्न करू असे संगितले.हा प्रकल्प सुमारे  ३.५० लाख खर्चाचा आहे.

छायाचित्र :भूमिपूजन करताना कमलेश फेरवानी,मिनाक्षी बोराटे व आणि मान्यवर. 

 

Peoples Media Pune.

© 2011. Peoples Media Pune

http://www.peoplesmediapune.com | Powered By Easily Editable Business Website - Joysite