Peoples Media Pune header

Go Back

आगळा वेगळा हळदीकुंकू व पुरस्कार वितरण समारंभ.

05 Feb 2020

माणुसकी फाउंडेशन,आधार फाउंडेशन व अक्षदा विवाह पुनर्विवाह संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने नुकताच एक आगळावेगळा तिळगूळ आणि हळदीकुंकू समारंभ नुकताच संपन्न झाला.क्राईम ब्रॅंचच्या पोलिस निरीक्षक स्वाती देसाई प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होत्या.अष्टांग आयुर्वेद महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.भीम गायकवाड,आधार फाउंडेशनच्या प्रज्ञा कांबळे,अक्षदा संस्थेच्या रसिका भवाळकर,माणुसकी फाऊंडेशनचे अध्यक्ष डॉ.राजेंद्र भावाळकर यांच्या पुढाकाराने हा समारंभ संपन्न झाला.विधवा,घटस्फोटीत,परित्यक्ता,अपत्यहीन महिला,तसेच कुमारी माता असलेल्या महिलांसाठी हळदीकुंकू समारंभाचे आयोजन करण्यात आले होते.या कार्यक्रमात कुंडलिक केदारी अनिता राकडे,संचालिका नवरत्न ओल्डेज होम,आनंदी गजानन जोशी(सामाजिक कार्यकर्त्या).वर्षाराणी मुळे आणि उमेश चाफे यांना सन्मानचिन्ह देवून सन्मानित करण्यात आले.आनंद कुलकर्णी यांनी “सुखी माणसाचा सदरा”या विषयावर उपस्थितांना मार्गदर्शन केले.डॉ.राजेंद्र भवाळकर यांनी प्रस्तविक केले.सुहास चव्हाण यांनी आभार मानले.या प्रसंगी नारद मंदिर संस्थेच्या सचिव जयश्री देशपांडे,शोभा बल्लाळ,हेमा फडतरे,दिव्या फाउंडेशनच्या सारिका अगज्ञान,अभिनेत्री माधवी मोरे,अभिनेत्री शितल करंजे,मिलिंद जोगळेकर,दिग्दर्शक सुनील नाईक आदी मान्यवर उपस्थित होते.

छायाचित्र : सत्कारार्थी व मान्यवर यांचे समूह चित्र. 

 

Peoples Media Pune.

© 2011. Peoples Media Pune

http://www.peoplesmediapune.com | Powered By Easily Editable Business Website - Joysite