Peoples Media Pune header

Go Back

मराठमोळा अभिनेता निशांत पाठारे साकारणार दबंग पोलिस अधिकारी...!

07 Feb 2020

छोट्या पडद्यावरील लक्षवेधी मालिका ललित २०५,प्रेमा तुझा रंग कसा,लक्ष्य आणि सध्या सुरू असलेली माझ्या नवर्‍याची बायको या मालिकेमध्ये झळकणारा निशांत आता एका नव्या मालिकेत पोलिस सब इन्स्पेक्टरची भूमिका सकारणार आहे. “फक्त मराठी”या वाहिनीवर “स्पेशल पोलिस फोर्स” ही नवीन मालिका लवकरच सुरू होणार आहे.या मालिकेची निर्मिती-दिग्दर्शन नंदिता कोठारी करत आहे.यापूर्वी निशांतने “सावधान इंडिया” या हिन्दी मालिकेमध्येही पोलीसाची भूमिका साकारली होती.मराठी मालिकेत पहिल्यांदाच निशांत पोलीसाची भूमिका साकारत आहे.नुकतीच या मालिकेच्या शूटिंगला सुरुवात झाली असून,ही मालिका फेब्रुवारी महिन्यात प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे.

छायाचित्र :निशांत पाठारे पोलीसाच्या भूमिकेत. 

 

Peoples Media Pune.

© 2011. Peoples Media Pune

http://www.peoplesmediapune.com | Powered By Easily Editable Business Website - Joysite