Peoples Media Pune header

Go Back

रोटरी क्लब ऑफ पुणे युनिव्हार्सिटीच्या व्यावसायिक गुणवत्ता व विशेष सेवा पुरस्कार प्रदान.

12 Feb 2020

रोटरी क्लब पुणे युनिव्हार्सिटीच्या वतीने अमलेंदू चौधरी(सिनेमाटोग्राफर) यांना व्यावसायिक गुणवत्ता पुरस्कार,क्षितिज पटवर्धन(लेखक)यांना “व्यावसायिक गुणवत्ता पुरस्कार”(व्होकेशनल एक्सलंस अवॉर्ड),तर सुधीर फडतरे (भारत नाटय मंदिर लाईट व्यवस्था) यांना “व्यावसायिक सेवा पुरस्कार”(सर्व्हिस एक्सलंस अवॉर्ड),निर्माते-दिग्दर्शक श्रीरंग गोडबोले यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.शाल,श्रीफल,सन्मानपत्र व स्मृतिचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप होते. मराठा चेंबर्सच्या सुमंत मुळगावकर सभागृह येथे संपन्न झालेल्या या कार्यक्रम प्रसंगी रोटरी क्लब युनिव्हार्सिटीच्या अध्यक्ष रो.सुजाता कुलकर्णी,सचिव प्रियांका कर्णिक,  व्होकेशनल डायरेक्टर रो.अनिरुद्ध रांजेकर,आदि मान्यवर उपस्थित होते.या प्रसंगी अमलेंदू चौधरी आणि क्षितिज पटवर्धन यांनी अत्यंत रंजक अशा मुलाखतीत त्यांचा जीवनप्रवास मांडला आणि तरुण पिढीला मार्गदर्शन केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रो.मंजिरी शहाणे यांनी तर आभार प्रदर्शन रो.अतुल गलांडे यांनी केले.  

छायाचित्र :पुरस्कार प्राप्त व मान्यवर यांचे समूह चित्र 

 

Peoples Media Pune.

© 2011. Peoples Media Pune

http://www.peoplesmediapune.com | Powered By Easily Editable Business Website - Joysite