Peoples Media Pune header

Go Back

“रोटरी मार्फत १०० प्राथमिक शाळांना १०,००० पुस्तके भेट!अवांतर वाचनाद्वारे विद्यार्थ्यांनी बहुश्रुत बनावे!”-अंजली देशमुखांचे प्रतिपादन

12 Feb 2020

रोटरी मार्फत १००प्राथमिक शाळांना १०,००० पुस्तके भेट. “आवांतर वाचनाद्वारे विद्यार्थ्यानी बहुश्रुत बनावे”असे प्रतिपादन रो.अंजली देशमुख यांनी केले.  “आज जग हे अधिक हिंसक व असंवेदनशील झाले आहे व माणुसकी आणि करुणा ही मानवी मूल्ये माणसात व समाजात कमी होत चालली आहेत.माणूस बनविणारी सर्वात महत्वाची गोष्ट  म्हणजे वाचन व त्याद्वारे माणूस अधिक समंजसपणे समजावून घेणे होय” असे प्रतिपादन लक्ष्मीकांत देशमुख माजी संमेलनाध्यक्ष यांनी रोटरी क्लब अपटाऊन मार्फत आयोजित पुस्तक प्रदर्शन व वाटप कार्यक्रमात वाचन संस्कृतीवर बोलतांना केले.एसएम जोशी हॉल येथे झालेल्या या कार्यक्रम प्रसंगी रोटरी क्लब अपटाऊन अध्यक्ष अंजली देशमुख व प्रांतपाल रवी धोत्रे यांनी पुणे शहर व जिल्ह्यातील १०० प्राथमिक शाळांना प्रत्येकी १०० ते २०० मराठी व इंग्रजी पुस्तके त्यांची शालेय ग्रंथालये समृद्ध करण्यासाठी व त्यांनी बहुश्रुत व्हावे यासाठी देत असल्याचे जाहीर केले.या रोटरी इंडियाच्या साक्षरता मिशन कार्यक्रमास माजी प्रांतपाल प्रशांत देशमुख,मिशन प्रमुख माधवी वझे,व माजी अध्यक्षा जयश्री पणजीकर यांच्यासह अनेक रोटरी क्लबचे अध्यक्ष,शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.

छायाचित्र :डावीकडून अंजली देशमुख,लक्ष्मीकांत देशमुख,रवी धोत्रे. 

 

Peoples Media Pune.

© 2011. Peoples Media Pune

http://www.peoplesmediapune.com | Powered By Easily Editable Business Website - Joysite