Peoples Media Pune header

Go Back

इ.१० वी व १२ वीच्या विद्यार्थ्यांसाठी परफेक्ट क्लास मार्गदर्शन व लकी ड्रॉ सोहळा आनंदमय वातावरणात व उत्साहात साजरा.

14 Feb 2020

     गेल्या १९ वर्षापासून अविरत सुरू असलेला मार्गदर्शन सोहळा या वर्षी देखील परफेक्ट क्लास,मुख्य शाखा रास्ता पेठच्या वतीने इ १० वी व १२ वी च्या विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन व लकी ड्रॉचे आयोजन नुकतेच करण्यात आले.सादर मार्गदर्शन सोहळा हा अतिचय आनंदमय वातावरण व उत्साहात साजरा करण्यात आला.सदर मार्गदर्शन विविध स्तरातील मान्यवरांचे विशेष मार्गदर्शन विद्यार्थ्यांना लाभले.परीक्षेच्या कलावधीत विद्यार्थ्यानी कशाप्रकारे तयारी करावी व अधिकाधिक गुणांनी कशाप्रकारे प्रावीण्य मिळवावे यावर अधिक भर देण्यात आला.

     सदर मार्गदर्शन सोहळ्यात पुण्याचे महापौर श्री.मुरलीधर मोहोळ.पुणे शहर सहा.पोलिस आयुक्त श्री दीपक हुंबरे,नगरसेविका कालिंदाताई पुंडे,परवीन हाजी फिरोज,हमिडा अनिस सुंडके,हासिना इनामदार,नगरसेवक अॅड.हाजी गफुर पठाण,विशाल धनवडे,आदि मान्यवर उपस्थित होते.सादर मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन परफेक्ट क्लासचे संस्थापक मा.इरफान सय्यद,व हिना सय्यद यांनी केले होते.तसेच क्लासचे मोईज खान,अद्नान शेख,अली शेख,हुरमत मॅडम,उजमा मॅडम यांनी देखील कार्यक्रम पार पाडण्याकरिता परिश्रम घेतले.

     सदर मार्गदर्शन कार्यक्रमात विद्यार्थ्याना उत्तेजनार्थ बक्षीस म्हणून लकी ड्रॉचे आयोजन करण्यात आले होते.व सादर लकी ड्रॉ मध्ये बंपर प्राइज म्हणून दुचाकी गाडीचे वितरण सहा.पोलिस आयुक्त यांच्या हस्ते करण्यात आले.तसेच नगरसेविका हासिना इनामदार यांनी येत्या काळातील १० वी व १२ वी च्या विद्यार्थ्यांपैकी जो कोणी विद्यार्थी १०० पैकी १०० गुण मिळवेल अशा विद्यार्थ्याला रुपये ५०,०००/- शिष्यवृत्ती देणार आहेत.   

 

Peoples Media Pune.

© 2011. Peoples Media Pune

http://www.peoplesmediapune.com | Powered By Easily Editable Business Website - Joysite