दरवर्षी प्रमाणे यावर्षीही श्री संत सेवालाल यांची २८१ वी जयंती पिरंगुट,ता,मुळशी येथे मोठ्या उत्साहात,वाजत गाजत मिरवणूक काढून साजरी करण्यात आली.जयंती निमित्त तालुक्यातील सर्व पक्षीय राजकीय मंडळी उपस्थित होते.बंजारा संघटनेचे तालुका अध्यक्ष आणि भावना फाउंडेशनचे संस्थापक मा.सुनील राठोड यांच्या अध्यक्षतेखाली मोठ्या संखेने तालुक्यातील सामाज एकत्र झाला होता.बंजारा समाजातील आर्थिक मागासलेपणा दूर करण्यासाठी शासनाचे नवनवीन योजना तालुकास्तरावर राबविण्याचे काम अध्यक्ष सुनील रठोड हे गेली अनेक वर्षापासून करत आहेत.बंजारा समाजातील बांधवांना हक्काची घरे मिळवून देण्यासाठी व न्याय मिळवून देण्यासाठी शासन दरबारी प्रयत्नशील असल्याचे सुनील राठोड यांनी या प्रसंगी संगितले.कार्यक्रमाचे आयोजन भावना फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष सुनील राठोड आणि त्यांच्या सहकार्यांनी केले.
छायाचित्र :कार्यक्रमास उपस्थित समाजबांधव
© 2011. Peoples Media Pune