Peoples Media Pune header

Go Back

“श्रोतेच मिळणार नसेल तर मराठी भाषा टिकणार कशी ?”-ज्येष्ट कवी अशोक नायगावकर.

19 Feb 2020

मराठी भाषिकांना मराठी भाषेच्या अस्तित्वाची चिंता लागून राहिली आहे.ही भाषा टिकण्यासाठी साहित्यिक व कलावंतांना श्रोतेच मिळणार नसेल तर मराठी भाषा टिकणार कशी ?असा सवाल प्रसिद्ध कवी अशोक नायगावकर यांनी मंगळवारी रात्री एका कार्यक्रमात उपस्थित  केला.

     महाशिवरात्र उत्सव समिति ट्रस्ट व भरत मित्रमंडळातर्फे नारायण पेठेत महाशिवरात्री निमित्त दिनांक १७ फेब्रु २०२० पासून महाशिवरात्र महोत्सव आयोजित केला आहे.या महोत्सवाचे हे २२ वे वर्ष आहे.या महोत्सवाचे दुसरे पुष्प काल मंगळवारी हास्य कवी समेलनाने गुंफन्यात आले.या हास्य कवी संमेलनात श्री नायगावकर यांच्या सहित प्रसिद्ध वात्रटिकाकार रामदास फुटाणे,बंडा जोशी,अनिल दिक्षित,भरत दौंडकर,कवियत्री अंजली कुलकर्णी,मृणालिनी कानीटकर-जोशी. सहभागी झाले होते. यावेळी श्री नायगावकर बोलत होते.

     हास्य कवी संमेलनाच्या तत्पूर्वी छायाचित्र क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्या बद्दल प्रसिद्ध छायाचित्रकार श्री.केशव वाडेकर,श्री.दिलीप वायचळ,श्री.राजेंद्र सोनार,आर्टिस्ट श्री सुरेश वेदपाठक,श्री.विनोद वेळापुरकर,श्री.प्रितेश उपासनी,श्री महेश अंकुश,शिल्पकार गणेश कुंभार यांचा माजी आमदार उल्हासदादा पवार यांच्या हस्ते शिवगौरव पुरस्कार प्रदान करून विशेष सन्मान करण्यात आला.शाल,श्रीफल,शंकराची मूर्ति,शिंदेशाही पगडी असे या शिवगौरव पुरस्काराचे स्वरूप होते. या प्रसंगी ट्रस्टचे अध्यक्ष बाळासाहेब दाभेकर,निरंजन दाभेकर,अनिल येणपुरे,राजेंद्र पंडित,महेश वाघ,शिरीष मावळे,प्रमोद घाडगे,नगरसेवक हेमंत रासने,आबा बालगुडे आदी मान्यवर उपस्थित होते. 

 

याप्रसंगी बोलताना रामदास फुटाणे म्हणाले की पूर्वी घराघरात तात्या,मामा,आई,बाबा,दादा,अशा आदरपूर्वक नावाने ज्येष्ट्रांना हाका मारल्या जात.त्यांचा सन्मान केला जात होता. पण आत आई बाबा एवजी मम्मी-डॅडी अशी हाक मारली जाते.मराठी मातृभाषा टिकवण्याची जबाबदारी जशी साहित्यिक कलावंतांवर आहे तसेच ती सर्वसामान्य मराठी माणसांचीही आहे.सूत्रसंचालन प्रसिद्ध निवेदक मिलिंद कुलकर्णी यांनी केले.                       

छायाचित्र :सत्कारार्थी व मान्यवर यांचे समूहचित्र 

 

Peoples Media Pune.

© 2011. Peoples Media Pune

http://www.peoplesmediapune.com | Powered By Easily Editable Business Website - Joysite